शास्त्र जाणून साधना केल्यास जीवन आनंददायी होते – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

तुजारपूर (ईश्‍वरपूर) येथे धर्मप्रेमींसाठी ‘साधना’ विषयावर मार्गदर्शन

तुजारपूर – येथे २३ नोव्हेंबरला सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रेमी महिलांसाठी ‘साधना’ विषयावर मार्गदर्शन आणि शंकानिरसन आयोजित करण्यात आले होते. याचा लाभ ३५ महिलांनी घेतला. मार्गदर्शन करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘शास्त्र जाणून साधना केल्यास जीवन आनंददायी होते. ‘नामजप साधना’ हा सर्वांत सोपा आणि सहज मार्ग असून त्याचा सर्व स्तरांवर जलद परिणाम होतो.’’ या वेळी महिलांनी धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment