श्री संत गजानन महाराज यांच्या चौथ्या भक्तसंमेलनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन

प्रदर्शनाचा लाभ घेतांना भक्त

खर्डी (जिल्हा ठाणे) – येथे श्री संत गजानन महाराज यांच्या भक्तांचे चौथे संमेलन भावपूर्ण वातावरणात नुकतेच पार पडले. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, तसेच धर्मशिक्षण देणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. संमेलनात निरूपणे, चर्चासत्रे, भजने, मुखोद्गत पारायणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ‘कोण तो सद्गुरु गजानन माझा’ या विषयावर भारताचार्य सु.ग. शेवडे यांचे, तर ‘आनंदाचे क्षण’ या विषयावर समर्थभक्त मोहनबुवा रामदासी यांचे निरूपण झाले.

क्षणचित्र

सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या वितरण कक्षाला अनेक भक्तांनी भेट देऊन संस्थेचे राष्ट्र-धर्माचे कार्य जाणून घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment