५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री त्रिपुरसुंदरी देवीचे त्रिपुरा येथील जागृत मंदिर, तेथील इतिहास आणि वैशिष्ट्ये

अभिषेक आणि यज्ञ झाल्यानंतर पूर्ण अलंकार घातलेले देवीचे रूप

 

मंदिर स्थापनेचा इतिहास

त्रिपुरा राज्यातील आगरतळा पासून २ घंटे अंतरावर असलेल्या उदयपूर या गावी त्रिपुरसुंदरी देवीचे शक्तीपीठ आहे. त्रिपुरसुंदरी देवीचे मंदिर कासवाच्या आकाराच्या टेकडीवर असल्याने या ठिकाणाला ‘कूर्मपीठ’ असेही म्हणतात. मंदिरात २ देवींच्या मूर्ती आहेत. मोठी मूर्ती त्रिपुरसुंदरी देवीची असून लहान मूर्ती ‘छोटी माँ’ देवीची आहे.

एका मान्यतेनुसार महाराज ज्ञान माणिक्य यांना (सध्या बांगलादेशातील) चट्टग्राम (चितगाव) येथून देवीची मूर्ती त्रिपुरा येथे आणून तिची स्थापना करण्याविषयी स्वप्नदृष्टांत झाला होता. महाराज ज्ञान माणिक्य यांनी इ.स. १५०१ मध्ये त्या वेळी ओळखल्या जाणार्‍या ‘रंगमती’ या ठिकाणी म्हणजे आताच्या टेकडीवर त्रिपुरसुंदरी देवीची स्थापना केली. त्यानंतर महाराज कल्याण माणिक्य यांनी मंदिराच्या परिसरात मोठे तळे खोदले जे ‘कल्याण सागर’ म्हणून ओळखले जाते. तळ्याचे खोदकाम करतांना ‘छोटी माँ’ देवीची मूर्ती सापडली. तिचीही मंदिरात स्थापना करण्यात आली.

मंदिराच्या पौराणिक संदर्भानुसार त्रिपुरा ही मगधेश्‍वरी राज्याची राजधानी होती. ‘शाक्त’ या ग्रंथानुसार हे स्थान ‘शाक्त पीठ’ म्हणूनही ओळखले जाते. याच ठिकाणी त्रिपुरसुंदरी देवीने त्रिपुरासुर नावाच्या असुराचा वध केला होता.

 

देवीच्या चरणांशी प्राणत्याग करणारी कासवे !

त्रिपुरसुंदरी देवीचे मंदिर आणि मंदिरासमोरील तळे

मंदिराच्या समोरील तळ्यामधे १०० वर्षांहून अधिक वयाची कासवे आहेत. जेव्हा तळ्यातील एखाद्या कासवाला ‘त्याचा मृत्यू जवळ आला आहे’ याची जाणीव होते, तेव्हा ते कासव तळ्यातून बाहेर येऊन मंदिराच्या पायर्‍या चढून मंदिरात जाते. त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालून देहत्याग करते. मंदिराच्या परिसरात देहत्याग केलेल्या कासवांची समाधी आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment