संत रामदासस्वामी यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद आहेत ! – पू. कौस्तुभबुवा रामदासी

नवरात्रीच्या निमित्ताने मिरज आणि सांगली येथे ग्रंथप्रदर्शन

मिरज येथील ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आरती करतांना पू. कौस्तुभबुवा रामदासी

मिरज – सनातन संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून या कार्यासाठी संत रामदासस्वामी यांचे आशीर्वाद आहेत, असे गौरवोद्गार संत वेणास्वामी मठाचे मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी काढले. २९ सप्टेंबर या दिवशी त्यांच्या हस्ते नवरात्रीच्या निमित्ताने ब्राह्मणपुरी येथील श्री अंबामाता मंदिर परिसरात लावण्यात आलेले सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनकक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी उपस्थित असलेले पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी हे गौरवोद्गार काढले.

सांगली येथील माधवनगर रस्ता येथील ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सनातन संस्थेचे हितचिंतक पी.के. फार्मासिटीकल्सचे श्री. प्रदीप किणीकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि श्रीकृष्णाची आरती करून करण्यात आले. या वेळी त्यांच्यासमवेत ‘एस्.जे. फार्मासिटीकल्स’चे श्री. श्रीकृष्ण जोशी उपस्थित होते.

मिरज येथील प्रदर्शन ८ ऑक्टोबरपर्यंत, तर सांगली येथील प्रदर्शन ७ ऑक्टोबरपर्यंत असून जिज्ञासूंनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment