ज्योतिषी आणि संत यांच्यातील भेद

Article also available in :

 

१. ज्योतिषी केवळ शास्त्र सांगू शकतात

‘ज्योतिषी केवळ शास्त्र सांगू शकतील; पण ते वाचवू शकणार नाहीत. संत उपाय सांगून त्रासाची तीव्रता न्यून करू शकतात. शुद्ध साधनेत बाह्य साधनांना फारसे महत्त्व नसते.’

– सौ. प्राजक्ता जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०१८)

 

२. संतांनी सांगितलेली वेळ ही त्यांच्या
संकल्पशक्तीतून योजलेली असल्यामुळे तोच मुहूर्त असणे

संत हे स्थळ, काळ आणि वेळ यांच्या पलीकडे गेलेले असतात. त्यामुळे एखाद्या वेळी संतांनी सांगितलेली वेळ ही त्यांच्या संकल्पशक्तीतून योजलेली असल्यामुळे तोच मुहूर्त असतो. त्याचा लाभ ब्राह्ममुहूर्ताप्रमाणे होतो.

 

३. ज्योतिषशास्त्र जाणणार्‍यांना मंत्रोपचार
उपदेशाचा अधिकार नसून त्यासाठी संतांचे मार्गदर्शन घ्यावे

‘जे लोक ज्योतिषशास्त्र जाणतात, त्यांनी दुसर्‍यांना मंत्रोपचाराचा उपदेश करायचा नसतो. ‘अमक्याचा जप करा, तमक्याची शांती करा’, असे ते सांगतात आणि समोरचा माणूस अगतिक झाल्याने हे सर्व करतो; परंतु त्याला फलप्राप्ती होत नाही. ज्योतिषाने कधीही अनुग्रह द्यायचा नसतो, त्याला तो अधिकार नाही. संत आणि उन्नत व्यक्ती यांनाच हा अधिकार आहे. ज्योतिषी केवळ शास्त्र सांगू शकतील; पण ते वाचवू शकणार नाहीत, यासाठी संतांना भेटून केवळ त्यांचे ऐकावे.’ (संदर्भ : अज्ञात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment