१०० टक्के अचूक भविष्यासाठी स्त्री बीज फलित झाल्याची वेळ कळणे आवश्यक !

साधारण हल्ली जे जन्मकुंडलीप्रमाणे ज्योतिषी जे सांगतात त्यातील ३० ते ३५ टक्के योग्य असते. ज्योतिषाची साधना आणि अभ्यास यांनुसार त्याचे प्रमाण वाढते. बाळाचा जन्म होतांना त्याचे डोक खाली दिसायला लागले, ती वेळ लक्षात घेऊन जर कुंडली मांडली, तर ती ३८ टक्क्यांपर्यंत योग्य येते. गर्भाशयाचे आकुंचन प्रथम व्हायला लागले, त्या जन्माच्या वेळेला तो पहिला सेकंद लक्षात घेऊन जर कुंडली मांडली, तर ती जवळजवळ ४४ टक्क्यांपर्यंत योग्य येते. आणखी त्याच्या आधी जाऊन गर्भाशयाची हालचाल होतांना स्त्रीला प्रथम कळते तो क्षण लक्षात ठेवूून जर जन्मकुंडली मांडली तर जवळजवळ ४७ ते ४८ टक्के योग्य येते. असे बरेच टप्पे आहेत. ज्या क्षणाला स्त्री बीज फलित होत तो जर क्षण कळला ते सगळे १०० टक्के योग्य भविष्य सांगता येऊ शकते; पण ते कळणार कोणाला ? आपल्या शरिरात कोट्यवधी पेशी आहेत. अगदी त्यातल्या एका पेशीत काय झाले ते आपल्याला कळूच शकत नाही. कोणाला कळते हे ? जी स्त्री स्वतःच संतांच्या पातळीला आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या ज्या पत्नी असायच्या त्यांना त्या क्षणाला हे समजायचे की आता गर्भधारणा झाली आहे. हल्ली आपल्याला तसे कळू शकत नाही.  (संग्राह्य लिखाण)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment