शेती करतांना करावयाच्या प्रार्थना

  • हे धरणीमाते, माझ्यामुळे तुला जो त्रास होणार आहे, त्यासाठी मला क्षमा कर. तुझ्या कृपेमुळे मला ही सेवेची संधी मिळत आहे.’
  • हे धरणीमाते, जलदेवते, वायूदेवते आणि आकाशदेवते ‘आपल्यामध्ये असलेले चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे. माझ्यावर आपले अखंड उपाय होऊ देत. माझा सतत नामजप होऊ दे.’
  • ‘हे आम्रवृक्षदेवतांनो, आम्ही ही फवारणी तुमच्यावर कीटकरूपी मांत्रिकांनी आक्रमण करू नये, यासाठी करत आहोत. या फवारणीमुळे तुम्हाला होणार्‍या त्रासासाठी आम्हाला क्षमा करा.’
  • ‘हे श्रीकृष्णा, झाडाच्या मित्र असलेल्या किडींवर फवारणीचा परिणाम होऊ नये; म्हणून त्या फवारणीचा परिणाम असेपर्यंत त्या दूर जाऊ देत आणि शत्रूकिडी नष्ट होऊ देत. फवारणीचा कोणताही अनिष्ट परिणाम झाडावर होऊ नये, ही तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
  • ‘हे देवा, आपल्या कृपाशीर्वादाने या झाडावर जी फळे लागणार आहेत, ती मधुर आणि स्वादिष्ट बनू देत. त्यांच्यात चैतन्य निर्माण होऊ दे. ही फळे खाणार्‍या व्यक्तीत राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांची ज्योत अखंड तेवत राहू दे.’
  • हे सूर्यदेवते आणि आकाशदेवते, आंबा वृक्षांचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होऊ दे.  त्यांना शक्ती आणि चैतन्य मिळू दे.

 

पारंपरिक शेतीच्या जतनासाठी काय कराल ?

१. पारंपरिक शेतीविषयी शेतकर्‍यांचे प्रबोधन

पारंपरिक अर्थातच नैसर्गिकरित्या शेतीचे महत्त्व आणि आधुनिकीकरणाचे तोटे, यांविषयी ठिकठिकाणच्या शेतकर्‍यांच्या संस्थांनी पुढाकार घेऊन शेतकर्‍यांचे प्रबोधन करावे. त्यासाठी संमेलने, चर्चासत्रे आयोजित करावीत.

२. पशूसंवर्धनाकडे गांभीर्याने लक्ष देणे

प्रत्येक शेतकर्‍याला चतुराईने, बुद्धीने रासायनिक खते आणि कीटकनाशक यांवर बहिष्कार घालावा लागेल. शेणखताच्या अधिकाधिक वापरासाठी पशूधन वाढवले पाहिजे. गायी अन् शेळी पाळल्या पाहिजेत. एक दिवस या चारचाकी, ट्रॅक्टर सर्व बंद होणार आहे; कारण पेट्रोल संपेल. जगात पेट्रोलचे प्रमाण अतिशय मर्यादित आहे. गाय पाळली, तर त्यापासून शेण आणि शेणापासून खत मिळेल. तसेच दूध आणि इतर पदार्थही मिळतात. गायीच्या मूत्रापासून कीटकनाशकाची आवश्यकता पूर्ण होते. रासायनिक खतांवर बहिष्कार टाकला, तर प्रत्येक वर्षी या देशाचे २० सहस्र कोटी रुपये वाचतील. भारत शासन जे विदेशाकडून आयात करते, त्यात सर्वाधिक आयात होणार्‍या वस्तू म्हणजे पेट्रोल, डिझेल, पेट्रोलियमची उत्पादने आणि ‘केमिकल फर्टिलायझरर्स’ हे आहेत.

३. स्वदेशी बियांचा वापर वाढवणे

स्वदेशी बियांचे चलन वाढायला हवे. विदर्भ, यवतमाळ जिल्ह्यात स्वदेशी बियाणे आहेत. त्यांच्याकडून ते बीयाणे घेऊन ठिकठिकाणी बियांची शेती करावी.

४. शेती उत्पादनात विविधता आणणे

भारतात शेतीत ‘मोनो कल्चर’ झाली आहे. अर्थात एकसारखी शेती पूर्ण देशात होत आहे, उदा. कापूस लावायला आरंभ केला, तर सर्वत्र कापूसच लावला. यात पालट करून उत्पादनात विविधता आणायला हवी. एकाच पिकासमवेत इतर पिकेही उत्पन्न करा. जेणेकरून मातीची शक्ती वाढेल. शास्त्रज्ञही हे सांगतात की, एका मागून परत तेच पीक लावल्याने मातीची क्षमता नष्ट होते.

५. भूमीचा पोत सुधारणे

प्रत्येक नदीतून कोट्यवधी टन माती निघू शकते. भारतात १० कोटी विद्यार्थी आहेत आणि २० कोटी सुशिक्षित निरुद्योगी आहेत. या निरुद्योगींना या कार्यात लावले, तर नदीतील माती शेतात जमा करता येईल. शेतकर्‍यांच्या शेतीच्या मातीचा वरचा स्तर वाढून तो उंची होईल. नद्यांची खोली वाढेल आणि माती शेतकर्‍यांच्या कामास येईल. शेतीच्या भूमीवर नवीन थर बसला, तर पुष्कळ मोठ्या प्रमाणावर उत्पादन आपोआपच वाढेल.

६. पाणी साठवण्यासाठी तळ्यांची व्यवस्था करणे

पावसाळ्यातील पाणी साठवण्यासाठी गावागावांत तळ्यांची निर्मिती करावी लागेल. त्यामुळे भूमीवरची पाण्याची पातळी आपोआप वाढेल. तसेच भूमीअंतर्गत पाण्याची पातळीही वाढेल. वर्ष १८०० च्या पूर्वी सिंचनाची जी व्यवस्था होती, त्यावर गंभीरतेने विचार आणि शोध लावावा लागेल.

७. वृक्षलागवड करणे

विदेशीकरण संपवण्यासाठी आणि भारतीय शेतीला उन्नत करण्यासाठी संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर झाडे (वृक्षारोपण) लावावी लागतील. आपल्या देशात ‘वृक्षआयुर्वेद’ नावाचे शास्त्र आहे, त्यात पुष्कळ ज्ञान आहे. प्रत्येक गावात काही प्रकारचे वृक्ष आवश्य असले पाहिजेत, उदा. कडुनिंब.

– स्वदेशी चळवळीचे प्रणेते स्वर्गीय राजीव दीक्षित.

 

साधनेच्या प्रयत्नांमुळे प्राण्यांपासून शेतीचे रक्षण झाल्याच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

पुष्कळ माकडे अन् जंगली जनावरे येऊनही त्यांनी पिकांची नासाडी न करणे !

शेतात अष्टदेवतांच्या चित्रांची पट्टी, विभूती, कापूर, गोमूत्र यांचा वापर करते. पुष्कळ माकडे आणि जंगली जनावरेही येतात; पण कोणत्याही पिकाची नासाडी न करता ती शांतपणे पाणी पिऊन गायीसाठी बांधलेल्या गोठ्यात आराम करतात. ही सगळी प.पू. गुरुदेवांचीच कृपा आहे.’

– सौ. आसावरी प्रसाद अर्वेन्ला, नागपूर

रात्री श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर शेताच्या भोवती सुदर्शनचक्र फिरत असल्याचे दिसणे !

भाताची लागवड (पेरणी) करण्यास दोन दिवस लागणार होते. सर्वांनी नामजप करत पेरणी केल्याने एकच दिवस लागला. रात्री श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर ‘त्याचे सुदर्शनचक्र शेताच्या भोवती फिरत आहे’, असे दिसत होते.

श्रीकृष्णाला प्रार्थना करून झोपल्यावर जनावरांच्या ओरडण्यामुळे जाग येणे

‘एप्रिल-मे २०१२ मध्ये मी शेतात भात पेरणीच्या वेळी सनातन-निर्मित उदबत्तीची विभूती मिसळून भातपेरणी केली. खतामध्ये आणि संपूर्ण शेतात विभूती पसरली. त्यानंतर भाताची रोपणी केली. शेतामध्ये सर्व ठिकाणी खोक्यांचे उपाय केले. (रिकाम्या खोक्यांमध्ये आकाशतत्त्व असल्याने वाईट शक्ती त्यात खेचली जाऊन जागेची शुद्धी होते.) रात्री मी शेतामधील घरात झोपायला जातो. तेथे गेल्यावर सूक्ष्मातून (मानसरीत्या) सर्व खोक्यांना उदबत्ती दाखवली आणि श्रीकृष्णाला प्रार्थना करून सांगितले, ‘जनावरे आल्यावर मला उठव.’ प्रत्यक्षातही जनावरे आल्यावर कुंपणाच्या कडेला डुकरे येऊन भांडण करत होती. त्यांच्या ओरडण्यामुळे मला जाग आली.

शेतात प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्याने शेतामध्ये जनावरे येणे बंद होणे !

‘भातही सजीव आहे’, असा भाव ठेवून मी शेतामध्ये सर्वत्र फिरून प.पू. भक्तराज महाराज यांची भजने सर्व पिकांना (भातशेतीला) ऐकवत होतो. त्या वेळी ‘भातांनी या जन्मात भजने ऐकायला हवीत. त्यांनी साधना केल्यास माझीही साधना होईल’, असे मला वाटत होते. भजनांच्या सात्त्विक नादामुळे शेताची शुद्धी झाली. त्यानंतर आमच्या शेतामध्ये जनावरे (गवे, रेडे, रानटी म्हशी आणि रानडुक्कर) येत नव्हती; पण आमच्या शेतातून जाऊन ती जनावरे इतरांचे शेत खाऊन जायची. कालांतराने ती आमच्या शेताकडे येण्याचेच बंद झाले.’

– श्री. ज्ञानेश्‍वर आपाना गावडे, गवेगाळी, खानापूर, बेळगाव.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment