सनातन संस्था महान धर्मकार्य करत आहे ! – प.पू. आनंदसिद्ध महाराज

प.पू. आनंदसिद्ध महाराज (डावीकडे) यांना ‘दैनिक सनातन प्रभात’चा विशेषांक भेट देतांना श्री. मनोज खाडये

आसुर्ले, (जिल्हा कोल्हापूर) – सनातन संस्था महान असे धर्मकार्य करत आहे. तुमच्या कार्याची आज हिंदु समाजाला आवश्यकता आहे, असे गौरवोद्गार प.पू. आनंदसिद्ध महाराज यांनी काढले. येथील ब्रह्मीभूत काडसिद्धेश्‍वर महाराज यांचे शिष्य प.पू. आनंदसिद्ध महाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ११ मे या दिवशी सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी महाराजांनी हे गौरवोद्गार काढले. या वेळी श्री. मनोज खाडये यांनी परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ११ मे या दिवशी प्रकाशित करण्यात आलेला ‘दैनिक सनातन प्रभात’चा विशेषांक त्यांना भेट दिला. या वेळी सनातन संस्थेेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे, श्री. राजू भोपळे, तसेच भक्तगण उपस्थित होते.

विशेष

प.पू. महाराजांची ज्या वेळी श्री. खाडये यांनी भेट घेतली, त्या वेळी तेथे चालू असलेल्या होमामध्ये प.पू. महाराजांनी आहुती देण्यास सांगितले, तसेच कार्याविषयी आपुलकीने चौकशी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात