महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शन !

ठाणे – महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. याला भाविकांसह मान्यवरांनीही भेट दिली.

जागमाता येथील भोलानाथ मंदिर येथील ग्रंथप्रदर्शन पहातांना शिवसेनेचे खासदार श्री. राजन विचारे
पिंपळेश्‍वर महादेव मंदिर येथील ग्रंथप्रदर्शनाला भेट देतांना गोलवली येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे वंदार सेठ पाटील
ग्रंथप्रदर्शन पहातांना कल्याण-डोंबिवलीच्या महापौर सौ. विनिता राणे

डोंबिवली (पूर्व) येथील सोनारपाडा भागातील पिंपळेश्‍वर महादेव मंदिरातील ग्रंथप्रदर्शनाला पोलीस आयुक्त दिलीप राऊत, गोलवली येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे वंदार सेठ पाटील, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर सौ. विनिता राणे, मलंगगड येथील आचार्य प्रल्हादशास्त्री महाराज यांनी भेट दिली. ‘पिंपळेश्‍वर महादेव मंदिर येथे संजीवन समाधी घेतलेले स्वामी शिवानंद महाराज यांनी तपश्‍चर्या केली होती. तसेच कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती, अनेक संत आणि महंत यांच्या पदस्पर्शाने हे स्थान पावन झाले असून महाराष्ट्र शासनाने याला ‘तीर्थक्षेत्र’ अशी मान्यता दिली आहे.

 

महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुंबई आणि नवी मुंबई येथे उपक्रम !

प्रदर्शनकक्षाला भेट देतांना भारताचार्य श्री. सु.ग. शेवडे आणि समवेत त्यांच्या पत्नी

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने मुंबई आणि नवी मुंबई येथील अनेक मंदिरांजवळ सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शनकक्ष उभारण्यात आले होते. याला मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.

चेंबूर येथील भूलिंगेश्‍वर मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या कक्षाला भारताचार्य श्री. सु.ग. शेवडे यांनी सपत्नीक भेट दिली, तर सांताक्रूझ येथील कलिना मार्केट येथील शिवमंदिराजवळ लावण्यात आलेल्या प्रदर्शनकक्षाला महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकरसिंह यांनी भेट दिली. भायखळा येथील श्री माणकेश्‍वर मंदिराजवळील ग्रंथप्रदर्शनास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार श्री. रमेश शेंडगे यांनी सपत्नीक भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. खारघर येथील शिव गणेश मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या प्रदर्शनकक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री. संजीव नाईक यांनी भेट दिली. या वेळी त्यांना दैनिक सनातन प्रभातचा महाशिवरात्रीचा विशेषांक देण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment