ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण देणारे फलक यांचे प्रदर्शन

ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) – येेथील खंडवा रोडवरील श्री गणपति मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण देणारे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येथील खासदार नंदकुमार चौहान, माजी शिक्षणमंत्री श्रीमती अर्चना चिटणीस, महापौर अनिल भोसले आदी मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली.

संकष्टी चतुर्थीनिमित्त येथे प्रतिवर्षी यात्रा भरते. प्रदर्शन लावण्यास सनातन प्रभातचे स्थानिक वाचक आणि मंदिराचे पुजारी श्री. बाळकृष्ण जोशी यांनी सहकार्य केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment