देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसे करावे ?

देवीला कुंकुमार्चन करण्याच्या दोन पद्धती, कुंकुमार्चन केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र आदींचा उहापोह या लेखात केला आहे. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रामुळे हा विषय वाचकांना समजून घेणे सोपे जाईल.

देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करतांना

१. पद्धती

१ अ. पद्धत १

‘देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे. काही ठिकाणी कुंकुमार्चनात कुंकू केवळ चरणांवर वाहतात.’ – ब्रह्मतत्त्व (सौ. पाटील यांच्या माध्यमातून, २२.२.२००४, रात्री ९.३०)

१ आ. पद्धत २

काही ठिकाणी देवीला कुंकुमार्चन करतांना कुंकू केवळ चरणांवर वाहिले जाते.

२. शास्त्र

‘मूळ कार्यरत शक्‍तीतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली अाहे. शक्‍तीतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणार्‍या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्‍तीतत्त्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणार्‍या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्‍तीतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणार्‍या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २०.१०.२००५, रात्री ९.५३)

कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते.जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्वकुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते.

३. कुंकुमार्चन केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

४. कुंकुमार्चन केल्यामुळे आलेली अनुभूती – कुंकुमार्चन केलेले कुंकू कपाळावर लावल्यावर प्रार्थना आणि नामजप चांगला होणे आणि उत्साह जाणवणे

‘२७.१.२००४ या दिवशी आम्ही देवळात कुंकुमार्चन करण्यासाठी गेलो होतो. आम्ही दिलेल्या कुंकवाने पुजार्‍यांनी दोन्ही मूर्तींचे अर्चन केले आणि त्यानंतर गार्‍हाणे घालून ते कुंकू आम्हाला दिले. कुंकू घेत असतांना मी देवीला प्रार्थना केली, ‘हे सातेरीदेवी, या कुंकवाने आम्हाला शक्‍ती मिळू दे, आमच्याकडून प्रार्थना आणि नामजप चांगला होऊ दे.’ त्या वेळेपासून जेव्हा जेव्हा मी ते कुंकू कपाळाला लावते, तेव्हा तेव्हा माझा नामजप चालू होतो आणि मला वेगळाच उत्साह जाणवतो.’ – सौ. रक्षंदा राजेश गावकर, फोंडा, गोवा.

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र’

Leave a Comment