एखाद्या देवतेचे नाव पुन:पुन्हा म्हणत रहाणे म्हणजे नामजप !


देवतेबद्दल भक्‍तीभाव निर्माण झाल्यानंतर देवतेचे नाम कसेही घेतले तरी चालते; पण भक्‍तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. देवतेची तारक आणि मारक अशी दोन रूपे असतात. भक्‍ताला आशीर्वाद देणारे रूप म्हणजे तारक रूप, उदा. नेहमी आढळणारा आशीर्वाद मुद्रेतील शिव. असुरांचा संहार करणारे रूप म्हणजे मारक रूप. देवतेप्रती सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो, तर देवतेकडून शक्‍ती आणि चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.नामजप म्हणजेएखाद्या देवतेचे नाव पुन्हा-पुन्हा म्हणत राहणे. सरावाने हे सातत्याने होऊ लागले की, आनंद मिळू लागतो.

Leave a Comment