हिंदु धर्माने सांगितलेल्या सात्त्विक वस्त्रांचे महत्त्व

१. कपड्यांचा उद्देश

आध्यात्मिकदृष्ट्या वस्त्र वायूमंडलातील सात्त्विक लहरींचे ग्रहण करणारे असावेत

कपडे घातल्यामुळे मनुष्याचे लज्जारक्षण होते, तसचे थंडी, वारा, ऊन आणि पाऊस यांपासूनही त्याच्या देहाचे संरक्षणही होते. आध्यात्मिकदृष्ट्या वस्त्राची उपयुक्‍तता ही सर्वतः वायूमंडलातील सात्त्विक लहरींच्या ग्रहणाला, तसेच प्रक्षेपणाला योग्य असणारी अशी असली पाहिजे, तरच आपले वायूमंडलातील वाईट शक्‍तींच्या त्रासदायक स्पंदनयुक्‍त आघातरूपी आक्रमणांपासून रक्षण होऊ शकते.

खालील चित्रांकडे एकवार पहा आणि त्यानंतर पुढील माहिती वाचा.

 

२. अयोग्य कपड्यांचा परिणाम

चित्रविचित्र, तसेच काळ्या रंगाचा जास्त वापर असलेली आणि भडक रंगांची वस्त्रे परिधान करणारा जीव कालांतराने तमोगुणी बनतो अन् त्याचे गुंड प्रवृत्तीत रूपांतर होऊ शकते.

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

३. हिंदु धर्माने सांगितलेली सात्त्विक वस्त्रे

हिंदु धर्मात ठरवलेली धर्मनियमांची आचारसंहिता धूतवस्त्र, साधे वस्त्र, फिकट एकसारखा रंग असलेले वस्त्र, न्यूनतम (कमीतकमी) वेलवीण असलेले वस्त्र यांसारख्या सात्त्विक वस्त्रांच्या आकार-प्रकारांना महत्त्व देते. वस्त्र एकसारख्या आध्यात्मिक रंगाचे आणि नक्षीविरहित असेल, तर ते जास्त सात्त्विक समजले जाते; कारण असे वस्त्र आकृतीविरहित असल्याने त्याला ब्रह्मांडातून येणारा निर्गुण चैतन्यलहरींचा प्रवाह आकृष्ट करण्यात, तसेच कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे तो वायूमंडलात अधिकतम (कमाल) स्तरावर प्रक्षेपित करण्यात आकारसदृशतेचा असा कोणताच अडथळा येत नाही. एकसारखा रंग असलेले वस्त्र जास्त प्रमाणात पारदर्शकतेचे दर्शक असल्याने ते आध्यात्मिकदृष्ट्या जास्त सत्त्वगुणी मानले जाते.

नऊवारी साडी कशी नेसावी ? (Video)

४. हिंदु धर्माने सांगितलेल्या वेशभूषेच्या सात्त्विक पद्धती

हिंदु धर्माने सांगितलेल्या वेशभूषेच्या सात्त्विक पद्धती या सात्त्विक रचनेच्या साहाय्यानेच ठरवल्या गेल्या आहेत. नऊवारी साडी, सहावारी साडी, परकर-पोलके, धोतर, सोवळे-उपरणे, अंगरखा-पायजमा अशा निर्गुणातून सगुणात नेणार्‍या वेशभूषेच्या पद्धती हिंदु धर्मात आचरणात आणल्या गेल्या.

४ अ. सात्त्विक वस्त्रांचे लाभ

शरिराला स्पर्श करणारे वस्त्र-प्रावरण शुद्ध आणि सात्त्विक, तसेच योग्य सात्त्विक आकार-रूपासह असेल, तर पुढील लाभ होतात.

१. वस्त्र-प्रावरण वायूमंडलातून येणारा ईश्‍वराचा चैतन्यस्त्रोत सर्वाधिक स्तरावर ग्रहण करून तो देहात संक्रमित करू शकते.

२. वस्त्रामुळे सगुण चैतन्य कार्यरत होण्यास साहाय्य होते, तर अंतर्यामी वृत्ती त्याच वेळी आपल्यातील तत्त्वस्वरूप निर्गुण बळावर प्रत्येक कृतीतील कर्माला बळ पुरवते.

३. वस्त्रे आध्यात्मिकदृष्ट्या नीटनेटकी असतील, तर जिवालाही शालीनता प्राप्त होते. हीच शालीनता त्याला आध्यात्मिक स्तरावर आचरण करण्यास भाग पाडते. आध्यात्मिक आचरणातून भाव निर्माण झाला की, जिवाचा ईश्‍वरप्राप्तीकडे प्रवास चालू होतो. हाच प्रवास शेवटी त्याला नित्याचा, म्हणजेच शाश्‍वताचा संग मिळवून देण्यात अग्रेसर ठरतो; म्हणून हिंदु धर्माने जिवाला घडवतांना त्याच्यावर वस्त्रे आणि अलंकारही संस्कार करू शकतील, असेच धर्मशिक्षण दिलेले आढळून येते.

५. आजची असुरी वृत्तीला खतपाणी घालणारी वस्त्रे

कलियुगात सर्वत्रच तमोगुणाचे वायूमंडलात संचारण वाढल्याने आता वस्त्र-प्रावरणे हीसुद्धा असुरांच्या वृत्तीला खतपाणी घालण्याकरिताच कार्यरत झालेली आढळतात. कलियुगातील मानवाने पूर्वापार जपलेली हिंदु संस्कृती सोडल्याने त्याच्यात विकृती निर्माण झाली आहे. ही विकृती कपड्यांच्या माध्यमातूनही दिसून येते. विविध प्राण्यांची चित्रे असलेले कपडे, भयानक भुतांचे चेहरे असलेले कपडे, विविध ठिकाणी फाटल्यासारखी वेलवीण असलेले कपडे, अनेक टिकल्या आणि रंगीत दोर्‍या लटकवलेले कपडे, अंगप्रदर्शन होईल असे कपडे, या सर्वांतून मनुष्य असुरांच्या आक्रमणांना बळी पडतो. कालांतराने तो नीतीभ्रष्ट बनतो आणि त्याचे सर्व आयुष्य विकृतीयुक्‍त जगण्यातच व्यय (खर्च) होते.
– सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, आषाढ शुद्ध चतुर्थी, कलियुग वर्ष ५११०, ६.७.२००८, सायंकाळी ७.०९)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’

Leave a Comment