सात्त्विक कपड्यांचे महत्त्व

Article also available in :

हिंदु संस्कृतीचे जतन आणि मुलांवर संस्कार होण्यासाठी सात्त्विक कपडेच श्रेयस्कर आहे. सात्त्विक कपड्यांचे महत्त्व, संतांच्या दृष्टीने बाह्य वेशभूषेचे महत्त्व यांविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.

१. सर्वसाधारण मनुष्यजिवाने सात्त्विक कपडेच का घालावेत ?

सात्त्विक कपडे घालण्यातून सात्त्विकता ग्रहण होण्यासह वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यास साहाय्य होते; म्हणून सर्वसाधारण मनुष्यजिवाने सात्त्विक कपडेच घालावेत.

२. भाव असलेल्या व्यक्तीने वेशभूषेला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही !

एखाद्यात भाव असेल, तर त्याची वृत्ती सात्त्विक बनते. या सात्त्विक वृत्तीमुळे, तसेच त्याच्याकडून होणार्‍या भावप्रधान कृतींमुळे त्याला ईश्वरी चैतन्य सहजपणे ग्रहण करता येते. तसेच ५० टक्क्यांपेक्षा जास्त पातळी असलेल्या जिवांना स्वतःतील चैतन्याच्या बळावर वाईट शक्तींचे आक्रमणे परतवून लावता येतात. अशा जिवांनी सात्त्विक कपडे घालण्याची तेवढी आवश्यकता नसते.

३. संतांच्या दृष्टीने बाह्य वेशभूषेला महत्त्व नसते !

७० टक्क्यांच्या पुढे आध्यात्मिक पातळी असणार्‍या उन्नतांच्या, म्हणजेच संतांच्या दृष्टीने बाह्य वेशभूषेला महत्त्व नसते. संतांची देहबुद्धी न्यून झालेली असल्याने आणि ते सातत्याने ईश्वरचिंतनात मग्न असल्याने त्यांनी कुठलाही वेश परिधान केला तरी फरक पडत नाही.

४. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍यांना वेशभूषेला महत्त्व देण्याची आवश्यकता नसते !

‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग बाह्य वेशभूषेला महत्त्व न देता किंवा कुठलेही अवडंबर न माजवता अंतर्गत शुद्धीकरणाला, म्हणजेच स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेला आणि अहं-निर्मूलनाला जास्त महत्त्व देत असल्याने साधकांचा कर्मकांडात वेळ न गेल्याने समष्टी साधनेच्या बळावर या मार्गाप्रमाणे साधना करणार्‍या साधकांची आध्यात्मिक उन्नती शीघ्रगतीने होते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १७.११.२००४, रात्री ९.५८)

असे असले तरी, भाव असलेले, चांगली पातळी असलेले इत्यादींनी सात्त्विक कपडे घातल्यावर त्यांची स्वतःची सात्त्विकता वाढतेच, तसेच त्या सात्त्विकतेचा समष्टीलाही मोठा लाभ होतो. सात्त्विक कपड्यांमुळे हिंदु संस्कृतीचे जतन आणि मुलांवर संस्कार होण्यासही साहाय्य होते. यासाठी त्यांनी सात्त्विक कपडे घालणे केव्हाही श्रेयस्करच आहे.

५. काही संप्रदायांत विशिष्ट वेशभूषा का सांगतात ?

‘काही संप्रदायांमध्ये विशिष्ट वेशभूषा (उदा. भगवे कपडे, गळ्यात माळा, जटा) का सांगितलेली असते ?’, असा प्रश्न काहींना पडू शकतो. याचे उत्तर असे की, ‘संप्रदायातील व्यक्ती ‘साधक’ या पंथाची आहे, याची तिला सतत जाणीव रहावी, एवढाच त्या वेशभूषेचा हेतू असतो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’

Leave a Comment