आगामी प्रयाग कुंभपर्वातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मजागृतीच्या कार्यासाठी महामंडलेश्‍वर स्वामी श्री शरणानंदजी महाराज यांचे आशीर्वाद !

महामंडलेश्‍वर स्वामी श्री शरणानंदजी महाराज यांची भेट घेतांना श्री. चेतन राजहंस

गोकुळ (उत्तरप्रदेश) – गोकुळ, मथुरा येथे सनातन संस्थेच्या वतीने श्री उदासीन कर्ष्णी आश्रमाचे महामंडलेश्‍वर स्वामी श्री शरणानंदजी महाराज यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी आगामी प्रयाग कुंभपर्वात राबवले जाणारे विविध धर्मजागृतीपर उपक्रम, तसेच सनातनचे धर्मकार्य यांची माहिती दिल्यानंतर महाराजांनी या कार्यासाठी आशीर्वाद दिले.

स्वामी श्री शरणानंदजी महाराज म्हणाले की,

१. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे आगामी प्रयाग कुंभपर्वात आयोजित केले जाणारे उपक्रम चांगले आहेत. या कार्याला माझा सदैव आशीर्वाद राहील.

२. कुंभपर्वात भाविकांसाठी धर्मजागृतीपर प्रदर्शन आणि संतसंमेलने आयोजित करण्यासाठी वृंदावन येथील स्वामी ज्ञानानंद महाराज यांची भेट घ्या.

३. संतसंमेलनांसाठी संतांचे संघटन करणारे राजकोट (गुजरात) येथील परमात्मा निकेतन यांचीही भेट घ्या.

४. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून चालू असलेले अधिवक्त्यांचे संघटन ही काळाची आवश्यकता आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात