चेन्नई येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सनातनच्या वतीने विशेष सत्संग

चेन्नई – अण्णानगर, चेन्नई येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष सत्संग घेण्यात आला. श्री. बालाजी यांनी त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील मित्रांसाठी या सत्संगाचे त्यांच्या निवासस्थानी आयोजन केले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘साधना करण्याचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान घेतले. श्री. बालाजी यांनी आपल्या जीवनात ‘गुरूंचे महत्त्व’ याविषयी विचार मांडले. उपस्थितांनी सत्संगात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करवून घेतले. असे सत्संग यापुढेही आयोजित करण्यात यावेत, अशी इच्छा उपस्थितांनी व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment