खामगाव येथे महेश नवमीनिमित्त ‘धार्मिक कृतींमागील शास्त्र’ या प्रवचनाचे आयोजन !

प्रदर्शन पहातांना जिज्ञासू महिला

खामगाव – १९ जून या दिवशी महेश नवमीनिमित्त येथील माहेश्‍वरी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्येे सनातनच्या साधकांना ‘हिंदु धर्मातील विविध धार्मिक कृतींमागील शास्त्र आणि जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार अकोला येथील सनातनच्या साधिका अधिवक्त्या (सौ.) श्रुती भट यांनी प्रस्तुत विषयावर प्रवचन केले.

८५ जिज्ञासूंनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या प्रसंगी माहेश्‍वरी समाजाच्या महिला बहुसंख्येनेे उपस्थित होत्या. सर्वांनी कार्यक्रम पुष्कळ आवडल्याचे सांगितले. महिन्यातून एकदा सत्संगाची मागणीही या वेळी करण्यात आली.

या कार्यक्रमाला खामगाव येथील माहेश्‍वरी समाजाचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र राठी आणि सचिव श्री. राजेंद्रकुमार भैय्या यांचे अनमोल सहकार्य लाभले. या प्रसंगी लावलेल्या सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.

 

अधिवक्ता श्री. तरुण मोहता यांची अभिनंदनीय कृती !

खामगाव येथील अधिवक्ता श्री. तरुण मोहता हे सनातनच्या रामनाथी आश्रमात २ आणि ३ जून २०१८ या दिवशी पार पडलेल्या ‘अखिल भारतीय अधिवक्ता शिबिरा’ला उपस्थित होते. सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याने प्रभावित होऊन आणि प्रेरणा घेऊन त्यांनी तत्परतेने हा कार्यक्रम खामगाव येथे आयोजित केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment