सोलापूर येथील नगरसेवक श्री. विक्रांत (मुन्ना) वानकर यांच्या हस्ते पूजन करून सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला प्रारंभ

धर्मरथाचे पूजन करतांना १. श्री. विक्रांत (मुन्ना) वानकर

सोलापूर – सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथाच्या माध्यमातून सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन येथील दत्त चौक, दत्त मंदिराच्या जवळ लावण्यात आले आहे. येथील भाजपचे नगरसेवक श्री. विक्रांत (मुन्ना) वानकर यांच्या हस्ते पूजन करून प्रदर्शनाला प्रारंभ करण्यात आला.

६ जूनपर्यंत सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत हे प्रदर्शन चालू असणार आहे. यात साधना, आयुर्वेदीय वनस्पती, आयुर्वेदीय औषधी, बालसंस्कार, ‘विकार निर्मूलनासाठी नामजप’, आचारधर्म, धर्मरक्षण, अशा विविध विषयांवरील अनेक ग्रंथ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने उपलब्ध आहेत, तरी याचा सोलापूर येथील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे सनातन संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment