सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांचा लाभ झाल्याने देवावर विश्‍वास बसून धर्माचरण करू लागणे आणि साधनेला आरंभ होणे

 

 

१. सनातन संस्थेच्या सात्त्विक अक्षरांतील देवतांचे
नामजप लिहिलेल्या आणि वास्तूशुद्धीसाठी उपयुक्त पट्ट्या घरात
लावल्यावर आधी जाणवणारा त्रास नाहीसा होऊन देवाविषयी विश्‍वास निर्माण होणे

‘पूर्वी मी पूर्णतः नास्तिक होते. आम्ही जिथे रहात होतो, तिथे मला वाईट शक्तीचे अस्तित्व जाणवायचे. तेव्हा पुष्कळ वेळा अनामिक भीतीही वाटायची. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी माझे पती देवळात दर्शनाला गेले होते. तिथे त्यांना सनातन संस्थेने लावलेला प्रदर्शन कक्ष दिसला. कुतूहल म्हणून त्यांनी नामजपाच्या पट्ट्या विकत घेतल्या आणि घरी आल्यावर सगळीकडे लावल्या. त्यानंतर ८ दिवसांतच विश्‍वास बसणार नाही, असे चांगले अनुभव आम्हाला आले. मला जाणवणारे वाईट शक्तीचे अस्तित्व आणि भीती नाहीशी झाली. घरात पुष्कळ उत्साह वाटू लागला आणि चैतन्य जाणवू लागले. ओळखीचे लोक घरी आल्यावर ‘घराला नवीन रंग लावला आहे का ?’ असे विचारू लागले. या सर्व अनुभवांनी मला साक्षात्कार झाल्यासारखे वाटले. तेव्हापासून ‘देव अशी एक शक्ती आहे’, हे मी मानायला लागले.

 

२. सनातनने प्रकाशित केलेले धर्मशास्त्राविषयीचे ग्रंथ वाचून धर्माचरण करू लागणे

पूर्वी मला ‘अध्यात्म हा पुष्कळ किचकट प्रकार आहे !’, असे मनातून वाटायचे आणि मी त्याची चेष्टा करायचे. सनातनचे ग्रंथ माझ्या वाचनात आल्यावर कळले की, हे तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कृतीमागचे विवेचन लक्षात आले. काही सूत्रे वाचून स्वतःमध्ये पालट केले, उदा. पूर्वी मी कपाळावर टिकली लावत असे. आपल्या ग्रंथात कुंकवाचे महत्त्व वाचल्यापासून मी टिकलीऐवजी कुंकू लावू लागले.

 

३. सनातनने प्रकाशित केलेले साधनाविषयक ग्रंथ वाचून कुलदेवता आणि
दत्त या देवतांच्या नामजपाला आरंभ करणे आणि त्यामुळे निश्‍चिंत रहाता येऊ लागणे

सनातन संस्थेने ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे कुलदेवीचा जप ‘श्री योगेश्‍वरीदेव्यै नमः ।’ आणि पूर्वजांचा त्रास होऊ नये; म्हणून ‘श्रीगुरुदेव दत्त’ हे दोन नामजप मी मनातल्या मनात करू लागले. नामजप चालू झाल्यापासून मी वर्तमानकाळात रहायला शिकले. ‘आता आपले जे काही बरे-वाईट होईल, ते श्री योगेश्‍वरीदेवी बघेल’, असा विश्‍वास निर्माण होऊन मी निश्‍चिंत रहायला लागले.

‘मी नास्तिक असतांना मला जो काही वाईट शक्तीचा अनुभव आला, ती सर्व योगेश्‍वरीदेवीचीच योजना होती आणि देवावर माझी श्रद्धा बसण्यासाठीच मला वाईट शक्तीचा अनुभव आला’, असे वाटते.’

– एक साधिका, चिपळूण, रत्नागिरी. (७.४.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Leave a Comment