वर्ष २६०० पर्यंत पृथ्वी आगीचा गोळा होईल ! – स्टीफन हॉकिंग

बीजिंग – पृथ्वीवरील वाढती लोकसंख्या आणि ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावरील वापर यांमुळे वर्ष २६०० पर्यंत पृथ्वी आगीचा गोळा होईल, असे विधान जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केले आहे. ‘मानवजातीचे अस्तित्व टिकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे’, असेही ते या वेळी म्हणाले. (स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी साधना करण्याशिवाय पर्याय नाही, हे हिंदूंनी जाणावे ! – संपादक) येथील ‘टेंसेंट वी’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हॉकिंग पृथ्वी ग्रहाच्या भविष्याविषयी बोलत होते. ‘माणसाला अस्तित्व टिकवण्यासाठी वस्ती करण्यायोग्य ग्रहाचा शोध आतापासूनच घ्यावा लागेल’, असे हॉकिंग यांनी यापूर्वी म्हटले होते.

हॉकिंग पुढे म्हणाले की, ‘ब्रेकथ्रू स्टारशॉट’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंतर्गत प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणारी अंतराळयाने बनवण्याच्या शक्यतांवर विचार केला जात आहे. अशी अंतराळयाने विकसित झाल्यास पृथ्वीवरून मंगळावर पोहोचण्यासाठी फक्त १ घंट्याचा प्रवास करावा लागेल, तर सौरमालेच्या काठावर असणार्‍या प्लुटोपर्यंत पोहोचण्यासाठी २४ घंटे लागतील; मात्र इतके वेगवान यान बनवूनही पृथ्वीप्रमाणे जीवसृष्टी असण्याची शक्यता असणार्‍या आपल्या सौरमालेपासून जवळच्या अल्फा सेंच्युरी या तारकासमुहापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल २० वर्षे लागतील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात