सनातनच्या कार्याला निश्‍चितपणे सहकार्य करू ! – सौ. शशिकला बत्तुल, उपमहापौर, सोलापूर

उपमहापौर सौ. शशिकला बत्तुल यांची सनातनच्या धर्मरथाला भेट !

उजवीकडे उपमहापौर सौ. शशिकला बत्तुल यांना ग्रंथांविषयी माहिती सांगतांना सौ. विद्या कुलकर्णी

सोलापूर : सनातन संस्था करत असलेले कार्य चांगले आहे. तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध काम करत आहात. त्यामुळे तुमच्या कार्याला यश प्राप्त होणार आहे. आम्ही जे करतो, तेथे स्वार्थ आहे; मात्र तुम्ही निःस्वार्थपणे कार्य करत आहात. तुमच्या कार्यासाठी शक्य ते सहकार्य मी निश्‍चितपणे करीन, असे प्रतिपादन येथील उपमहापौर सौ. शशिकला बत्तुल यांनी केले. दत्त चौक येथे सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन धर्मरथात लावण्यात आले होते. या धर्मरथाला सौ. बत्तुल यांनी भेट दिली. या वेळी माजी नगरसेवक बापू ढगे हेही उपस्थित होते. सनातनच्या साधिका सौ. विद्या कुलकर्णी यांनी सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांविषयी सौ. बत्तुल यांना माहिती दिली. सनातनच्या सौ. माधुरी डिंगरे यांनी त्यांना सनातनचा ‘सोळा संस्कार’ हा ग्रंथ भेट दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment