सूचनासत्राचे वेळापत्रक कसे असावे ?

१. सूचनासत्राचे (अभ्याससत्राचे) वेळापत्रक

अ. व्यक्तींनी स्वभावदोषांच्या अभिव्यक्तींवर मात करण्यासाठी स्वतःला खालील पद्धतीने पुढे दिलेल्या तत्त्वावर आधारित सूचना दिल्या पाहिजेत आणि अ १, अ २, अ ३, आ १ आणि / किंवा आ २ या पद्धती वापरल्या पाहिजेत.

आ. उपचाराचे प्रत्येक अभ्याससत्र सुमारे आठ मिनिटांचे असले पाहिजे, हा सर्वसाधारण नियम आहे. हा वेळ पुढीलमाणे वापरावा.

टीप १ – मन एकाग्र होण्यासाठी स्वसंमोहनाच्या विविध पद्धती उपयुक्त ठरतात. त्या पद्धतींची सविस्तर माहिती सनातनच्या संमोहनशास्त्र
या ग्रंथात दिली आहे. मन एकाग्र करण्यासाठी नामजप करणे ही तुलनेने सोपी पद्धत येथे वापरली आहे.

टीप २ – प्रगतीची सूचना तयार करतांना स्वभावदोष-निर्मूलन तक्त्याची मदत घ्यावी. त्यातील अयोग्य कृती व अयोग्य प्रतिक्रिया, अयोग्य कृतीचा किंवा अयोग्य प्रतिक्रियेचा कालावधी, स्वभावदोष व प्रगती या रकान्यांमधील माहितीचा प्रामाणिकपणे व त्रयस्थपणे अभ्यास करून स्वभावदोषातील सुधारणा निश्‍चित करावी. प्रक्रियेसाठी निवडलेल्या स्वभावदोषांमधील सुधारणा अथवा गती पुढील घटकांवरून निश्‍चित करावी.

टीप ३ – व्यक्तीमत्त्वातील स्वभावदोषांच्या कुठल्याही दोन किंवा तीन अभिव्यक्ती घेऊन अ १, अ २, आ १ किंवा आ २ या उपचारपद्धती
वापरून अभ्याससत्रे करावीत. प्रत्येक सूचना वरील पद्धतीनुसार पाच वेळा परत परत द्यावी.

टीप ४ – अ ३ उपचारपद्धतीवर आधारित स्वयंसूचना देण्यास जास्त वेळ (३-४ मिनिटे) लागत असल्यामुळे प्रत्येक अभ्याससत्रात या उपचारपद्धतीवर आधारित स्वयंसूचना असलेला एकच स्वभावदोष किंवा स्वभावदोषाची एकच अभिव्यक्ती निवडावी आणि ही सूचना प्रत्येक अभ्याससत्रात एकदाच द्यावी.

 

२. अभ्याससत्रे करतांना लक्षात घ्यावयाचे मुद्दे

१. अभ्याससत्रे करतांना संमोहनावस्थेला फक्त १० टक्के इतकेच महत्त्व असते, तर उपचारांच्या सूचनांना ९० टक्के इतके महत्त्व असते. संमोहनावस्था फक्त उपचारांचा काळ कमी करण्यास मदत करते, तर उपचारांच्या सूचना व्यक्तीतील स्वभावदोष दूर करतात.

२. अभ्याससत्र करतांना कुलदेवतेचा किंवा उपास्यदेवतेचा नामजप करावा. नामजप करतांना ठराविक अंतराने प्रार्थना करण्यासाठी थांबतो, त्या वेळीही आपण स्वयंसूचना देऊ शकतो.

३. नामजप करण्यापूर्वी उपास्यदेवतेला प्रार्थना करावी.

३ अ. स्वयंसूचनेच्या अभ्याससत्रात प्रार्थनेचे महत्त्व

संमोहन-उपचारतज्ञ  हे मानसिक स्तरावर दिलेल्या सूचनांद्वारे मनाचे अंतःपटल भेदतात. या सूचनांमधील सूक्ष्म-विचारलहरींतील त्रिगुण उपचार घेणार्‍याच्या मनोमयकोषात प्रवेश करतात. त्यामुळे सूचनेतील विचारांचे प्रतिबिंब उपचार घेणार्‍या जिवाच्या मनोमयकोषात उमटल्याने तो जीव त्या सूचनेमाणे सकारात्मक विचार करू लागतो. त्यामुळे जिवाच्या मनोमयकोषातील रज-तम कणांचे प्रमाण हळूहळू कमी झाल्याने जीव रोगमुक्त होतो; परंतु ईश्‍वराला प्रार्थना करून सूचना दिल्याने सूचनेतील विचारलहरींतील सत्त्वकणांचे प्रमाण वाढते. त्यामुळे उपचार घेणार्‍या जिवालाही प्रार्थना करायला लावली असता, प्रार्थनेमुळे जिवाच्या मनोमयकोषाची त्रिगुण ग्रहण करण्याची क्षमता वाढून तो जीव खूपच लवकर बरा होतो. मनोमयकोषातील वाढलेल्या सत्त्वकणांमुळे चित्तावरील संस्कार कायमचे कमी होण्यास मदत होते. अध्यात्माची जोड न देता केलेल्या उपचारपद्धतीत कालांतराने तो जीव पुन्हा मनोरुग्ण बनू शकतो. यावरूनच प्रत्येक कृती साधनेच्या दृष्टीकोनातून करणे किती महत्त्वाचे आहे, हे कळते. – श्री गुरुतत्त्व [सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ९.४.२००४, रात्री ९.०२]

४. अभ्याससत्राचा ८ मिनिटांचा कालावधी कमी किंवा अधिक झाल्यास विशेष फरक पडत नाही. अभ्याससत्रात कालावधीपेक्षा स्वयंसूचना प्रभावीपणे देण्यास अधिक महत्त्व आहे.

५. तीन वेगवेगळ्या स्वभावदोषांच्या अभिव्यक्ती असलेल्या सूचना कमीतकमी आठवडाभर देणे आवश्यक आहे.

६. गतीची सूचना त्येक अभ्याससत्राच्या सुरुवातीला फक्त एकदाच द्यावी.

७. अभ्याससत्रे करतांना प्रथम एका स्वभावदोषाच्या प्रकटीकरणावर पाच वेळा स्वयंसूचना दिल्यानंतर मधे थांबून प्रार्थना करावी. त्यानंतर लगेच दुसर्‍या स्वभावदोषाच्या अभिव्यक्तीवर स्वयंसूचना द्यावी. त्यासाठी पुन्हा ३ मिनिटे नामजप करण्याची आवश्यकता नाही.

८. अभ्याससत्र करतांना चित्त एकाग्र होत नसेल किंवा सूचनेतील शब्दांचे विस्मरण होत असेल, तर सूचना कागदावर लिहून त्या प्रत्येकी ५ ते १० वेळा वाचाव्यात, किंवा बघून अथवा न बघता ५ ते १० वेळा लिहाव्यात. वाचण्यापेक्षा लिहिण्याच्या कृतीमुळे एकाग्रता साधण्यास अधिक मदत होते.

९. दिवसातून कमीतकमी तीन अभ्याससत्रे करावीत व जास्तीतजास्त सहापर्यंत वाढवावीत. मात्र एखादी व्यक्ती जेवढी जास्त अभ्याससत्रे करील, तेवढा तिला लवकर व अधिक फायदा होतो.

१०. एखादी व्यक्ती सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्र या चार वेळेत स्वयंसूचनेची अभ्याससत्रे करत असल्यास समजा या काळात त्या व्यक्तीकडून मध्येच एखादे चुकीचे वर्तन घडले, तर तिने त्याबाबत सूचना देता कामा नये. प्रत्येक चुकीचे वर्तन कमी करण्यासाठी, तिने स्वतःला किमान एक आठवडाभर नियमितपणे स्वयंसूचना देणे आवश्यक आहे.

११. एक आठवडाभर नियमितपणे अभ्याससत्रे केल्यानंतर एखाद्या स्वभावदोषात काही सुधारणा झाल्यास त्या स्वभावदोषाच्या विशिष्ट अभिव्यक्तीशी संबंधित स्वयंसूचना थांबवाव्यात. त्यानंतर प्रक्रियेसाठी त्याच स्वभावदोषाची दुसरी अभिव्यक्ती निवडावी किंवा दुसरा स्वभावदोष निवडावा.

त्यानंतर काही दिवसांनी जर पहिल्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून तोच स्वभावदोष उफाळून आला, तर पुन्हा काही दिवस त्या स्वभावदोषाच्या पहिल्या अभिव्यक्तीवर स्वयंसूचना द्याव्यात.

१२. एखाद्या स्वभावदोषाची तीव्रता अधिक असेल, तर त्या स्वभावदोषाविषयी सूचना देण्यास सुरुवात केल्यानंतर सुधारणा होण्यास दोन किंवा अधिक आठवडे लागतात; पण अभ्याससत्रे नियमितपणे सुरू ठेवल्यास काही दिवसांन त्या स्वभावदोषात लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येते.

१३. एखाद्या स्वभावदोषात सुधारणा झाली; म्हणजे ती त्या स्वभावदोषापासून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल असते आणि सूचनेची जादा कुमक मिळाली नाही, तरी ती पुढे चालू रहाते. त्यामुळे प्रक्रियेसाठी दुसरा स्वभावदोष निवडू शकतो.

१४. एक आठवडा सूचना देऊनही एखाद्या स्वभावदोषात काहीच फरक पडला नाही, तर तीच सूचना तीन ते चार आठवडे पुन्हा द्यावी. तरीसुद्धा काही सुधारणा दिसून आली नाही, तर ती सूचना ग्रहण करण्यास खूप मानसिक विरोध आहे, असे समजावे. अशा वेळी ती सूचना देणे थांबवून त्याऐवजी दुसर्‍या स्वभावदोषाबद्दल सूचना द्यावी.

१५. काही आठवड्यांनंतर पुन्हा खूप मानसिक विरोध असलेल्या मागील स्वभावदोषाबद्दल सूचना देता येतात. त्या सूचना नंतर परिणामकारक ठरतात; कारण तोपर्यंत मनावरील ताण काही प्रमाणात कमी झाल्यामुळे मुक्त झालेली मनाची अधिकाधिक ऊर्जा मानसिक विरोध असलेला स्वभावदोष दूर करण्यासाठी उपलब्ध होते.

१६. स्वयंसूचनेची अभ्याससत्रे करण्यास सुरुवात केल्यानंतरही दररोज नियमितपणे स्वभावदोष-निर्मूलन तक्ता लिहिणे सुरूच ठेवावे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ `स्वभावदोष-निर्मूलन : खंड २’

Leave a Comment