देहलीसह उत्तर भारताला भूकंपाचा धक्का

नवी देहली : राजधानी देहलीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये २ जूनच्या पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५ इतकी होती.

पहाटे ४.२५ वाजता हे धक्के जाणवले. देहली, एन्सीआर् आणि हरियाणाच्या हिस्सारमध्ये हे धक्के जाणवले. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या भूकंपाचे केंद्र हरियाणातील रोहतक येथे भूमीमध्ये २२ किलोमीटर खोलवर होते.

पृथ्वीवर नैसर्गिक आपत्ती किंवा अराजकासारखी स्थिती एकाच वेळी
निर्माण होईल आणि ‘सर्व ईश्वराच्या हातातच आहे’, हे राजाच्या लक्षात येईल !

तिरुवण्णमलई, तमिळनाडू येथे ११.२.२०१७ या दिवशी झालेल्या ‘नाडीवाचन क्रमांक ११४’मध्ये महर्षि म्हणतात, ‘‘येणार्या२ काही दिवसांमध्ये पृथ्वीवरील ६५ ते ७५ राष्ट्रांमध्ये प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडणार आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा अराजकासारखी स्थिती एकाच वेळी निर्माण होईल. अशी स्थिती असेल की, तेथील राजाच्या (राज्यकर्त्याच्या) हातामध्ये काहीच नसेल. तो काहीही करू शकणार नाही. ‘हे सर्व ईश्वखराच्या हातातच आहे’, हे त्याच्या लक्षात येईल.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात