त्रिगुणातीत काळभैरवाला मदिरा अर्पण का करतात ?

काळभैरव

प्रश्‍न : मी उज्जैन येथील काळभैरवाच्या मंदिरात गेलो होतो. तेथे काळभैरवाला दारू अर्पण केली जात होती. मला कळले नाही की, देवाला दारू कशी अर्पण केली जाते ? यामागे काही शास्त्र आहे कि ती केवळ एक प्रथा आहे ?

उत्तर : काळभैरव हा शिवाचा अंशावतार आहे. त्यामुळे शिवाप्रमाणेच काळभैरवाकडेही उत्पत्ती, स्थिती आणि लय यांपैकी लयाचे कार्य आहे. भगवंत जेव्हा एखाद्या गोष्टीचा लय करतो, तेव्हा त्याद्वारे तो त्या गोष्टीचा उद्धारच करत असतो. या कार्यासाठी त्याला तमोगुणाची आवश्यकता असते. देवता या सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या पलीकडे गेलेल्या असल्यामुळे काळभैरवातील तमोगुण जागृत ठेवण्यासाठी त्याला तमोगुणी मदिरा अर्पण केली जाते. मात्र भगवंताचा तमोगुण हा शुद्ध तमोगुण असतो. भगवंत त्रिगुणातीत असल्याने त्याचे तमोगुणावर आधिपत्य असते. त्यामुळे मदिरेतून उत्पन्न झालेल्या तमोगुणाचा उपयोग तो लयाचे तत्त्व जागृत ठेवून वाईट शक्तींपासून पूर्ण सीमेचे रक्षण करण्यासाठी करतो. मनुष्याच्या तमोगुणात मात्र विकार असतात. त्यामुळे मनुष्य मदिरा प्यायला, तर तिच्यातील तमोगुण सहन न झाल्याने त्याचा विनाश ओढवतो. मानवासारखे देवतांचे वर्तन होत नाही. ‘देवाला दारू कशी अर्पण करायची ?’, हा मानसिक स्तरावरील विचार झाला. त्रिगुणातीताला त्याच्या कार्यानुसार मदिरा अर्पण करू शकतो.

संदर्भ :  दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment