पुणे : सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या परिसरात ३ जूनला रात्री ११ वाजून ४४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू धरण परिसरातील भूमीपासून १० किलोमीटर इतक्या खोलीवर होता. या भूकंपाचे धक्के पुणे, सांगली, कोल्हापूर आणि गोवा येथेही जाणवले. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. गेल्या मासातही कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाचे अतिशय सौम्य धक्के जाणवले होते.
पृथ्वीवर नैसर्गिक आपत्ती किंवा अराजकासारखी स्थिती एकाच वेळी
निर्माण होईल आणि ‘सर्व ईश्वराच्या हातातच आहे’, हे राजाच्या लक्षात येईल !
तिरुवण्णमलई, तमिळनाडू येथे ११.२.२०१७ या दिवशी झालेल्या ‘नाडीवाचन क्रमांक ११४’मध्ये महर्षि म्हणतात, ‘‘येणाऱ्यां काही दिवसांमध्ये पृथ्वीवरील ६५ ते ७५ राष्ट्रांमध्ये प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडणार आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा अराजकासारखी स्थिती एकाच वेळी निर्माण होईल. अशी स्थिती असेल की, तेथील राजाच्या (राज्यकर्त्याच्या) हातामध्ये काहीच नसेल. तो काहीही करू शकणार नाही. ‘हे सर्व ईश्वराच्या हातातच आहे’, हे त्याच्या लक्षात येईल.’’
उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !
रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका
युरोपात युद्धाचे ढग गडद !
२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !
अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !