पतंजलि योगपीठ आणि गोकुलम गौरक्षण संस्था अमरावती यांच्या वतीने राष्ट्र-धर्म कार्य करणाऱ्यां सनातन संस्थेचा सन्मान

व्यासपिठावर ‘बालसंस्कार’ या गुरुपौर्णिमा विशेष स्मरणिकेचे विमोचन करतांना मान्यवर

अमरावती : येथील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ उद्योजक अन् समाजसेवक श्री. लप्पीसेठ जाजोदिया यांच्या वाढदिवसानिमित्त पतंजलि योगपीठ आणि गोकुलम गौरक्षण संस्था अमरावती यांच्या वतीने याच गोकुलम गौरक्षण संस्थेमध्ये ४ जून या दिवशी धार्मिक, सामाजिक, राष्ट्र यांच्या संदर्भात समर्पित कार्य करणाऱ्यां १२६ संघटनांचा सत्कार अन् सन्मान करण्यात आला.

यामध्ये सन्मानपत्र आणि गोमातेची मूर्ती देऊन सनातन संस्थेचाही सन्मान करण्यात आला. सनातनचे साधक डॉ. (सौ.) समिधा वरूडकर आणि त्यांचे यजमान डॉ. रमेश वरूडकर यांनी सन्मान स्वीकारला.

या वेळी पतंजलि योगपिठाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. विष्णू भुतडा, गोकुलम गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि अमरावती येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. हेमंत मुरके, पालकमंत्री अन् राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे, अमरावती येथील पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय मंडलिक, खासदार श्री. आनंदराव अडसूळ, युवा स्वाभिमान पक्षाच्या सौ. नवनीत राणा, ईस्कॉनचे श्री मधुपतीजी, ओम शांतीच्या सीतादीदी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते संघटनांचा सन्मान करण्यात आला.

मान्यवरांकडून सनातनच्या कार्याची प्रशंसा

मान्यवरांच्या हस्ते सनातन संस्थेच्या ‘बालसंस्कार’ या गुरुपौर्णिमा विशेष स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. श्री. लप्पीसेठ जाजोदिया यांना वाढदिवसानिमित्त सनातन संस्थेचे ग्रंथ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवाचा विशेषांक भेट म्हणून देण्यात आला. मान्यवरांनी सनातनच्या कार्याची प्रशंसा केली.