भारतीय शास्त्रीय संगीत कलाकारांची दयनीय स्थिती

मी मागील १५ वर्षांपासून तबलावादन करत असल्याने मी शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. या कालावधीत मला अनेक प्रसिद्ध कलाकारांसमवेत रहाण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझ्या लक्षात आलेली शास्त्रीय संगीतातील कलाकारांची दयनीय स्थिती येथे देत आहे.

१. एका प्रसिद्ध तबलावादकांना व्यसनामुळे तबला वाजवता न येणे

एका सुप्रसिद्ध तबलावादकांकडे मी तबला शिकत होतो. एक दिवस त्यांच्याशी वार्तालाप करतांना मला असे कळले की, पूर्वी एक प्रसिद्ध तबलावादक होते. आता दारूचे व्यसन लागल्याने त्यांना पूर्वीसारखा तबला नीट वाजवता येत नाही.

२. संगीत महोत्सवासाठी आलेल्या काही कलाकारांनी रात्री दारू पिण्याचा कार्यक्रम करणे

एकदा मी माझ्या गुरुजींसमवेत एका ३ दिवसीय संगीत महोत्सवासाठी गेलो होतो. त्या संगीत महोत्सवात देशातील इतर प्रसिद्ध कलाकारही आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यासाठी आले होते. या कार्यक्रमासाठी रात्री हॉटेलवर पोचल्यावर माझ्या लक्षात आले, रात्रीच्या वेळी काही कलाकारांचा दारू पिण्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे मला आणि आणखी एका विद्यार्थ्याला त्यांनी बाहेर जाण्यास सांगितले.

३. संगीत महोत्सवासाठी आलेले एक प्रसिद्ध गायक
आणि त्यांचा तरुण मुलगा या दोघांनाही दारूचे व्यसन असणे

एकदा मी एका मोठ्या संगीत महोत्सवामध्ये गेलो होतो. त्या महोत्सवात एक प्रसिद्ध गायक आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा गायक असलेला २२ वर्षांचा मुलगाही आला होता. त्या मुलाशी माझी ओळख झाल्यामुळे कार्यक्रमाला आरंभ होण्यापूर्वी तो मला भेटला. त्या वेळी त्याच्या जवळ गेल्यावर मला दारूचा दुर्गंध आला. नंतर एका कलाकाराकडून मला असे कळले की, त्याचे वडीलही दारू पितात आणि मुलगाही नेहमी दारूच्या नशेतच असतो.

४. एका प्रसिद्ध गायकाच्या घरातील
वातावरण त्रासदायक असणे आणि ते स्वतः व्यसनी असणे

एके दिवशी सकाळी मी आणि माझा मित्र एका प्रसिद्ध गायकाला भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या घरातील वातावरण मला त्रासदायक जाणवले. काही वेळाने त्या गायकाने आम्हाला पिण्यासाठी पाणी आणून दिले. आम्हाला पाणी देत असतांना त्यांचे हात थरथरत होते. ते आमच्याजवळ आल्यावर आम्हाला दारूचा वास आला.

५. कलाकाराच्या प्रसिद्धीनुसार कार्यक्रमासाठी लाखो रुपयांपर्यंत पैसे घेणे

सद्यस्थितीत अनेक कलाकार कार्यक्रमासाठी किती पैसे मिळतील, याचा अंदाज घेऊनच कार्यक्रम निश्‍चित करतात. एका कार्यक्रमासाठी साधारण २० ते २५ सहस्र रुपये घेतात. प्रत्येक कलाकार किती प्रसिद्ध आहे, यानुसार हा आकडा लाखो रुपयांपर्यंत जातो. सध्याच्या काळात शास्त्रीय संगीताकडे साधना किंवा ईश्‍वराकडे जाण्याचा मार्ग म्हणून न बघता केवळ पैसा कमावण्याचे साधन म्हणूनच पाहिले जाते.

६. आपल्याजवळील ज्ञान इतरांना न देणे

अनेक कलाकार आपल्याकडील ज्ञान किंवा शिकायला मिळालेल्या नवीन गोष्टी एकमेकांना सांगत नाहीत. दुसरा कलाकार आपल्यापेक्षा पुढे जाऊ नये, हाच यामागील उद्देश असतो. प्रत्येकजण दुसरा कुठे न्यून आहे, याचीच चर्चा करत असतो.

७. क्षुल्लक गोष्टीसाठी इतरांवर ओरडण्याच्या कलाकाराच्या वागण्यामुळे
अनेकजण दुखावले जाणे आणि त्याला एका विद्यालयातून काढून टाकण्यात आलेले असणे

एकदा मी कत्थक नृत्याला साथ करण्यासाठीच्या सरावाला गेलो होतो. त्या सरावासाठी मी आणि दुसरा एक संवादिनी वादक होता. सरावाला आरंभ झाल्यावर माझ्याच वयाचा एक कत्थक नृत्य कलाकार माझ्यावर क्षुुल्लक गोष्टींसाठी ओरडू लागला. त्याला व्यवस्थित नृत्य करता येत नव्हते; परंतु तरीही मी एक मोठा कलाकार आहे, अशा आविर्भावात तो वागत होता. या प्रसंगानंतर संवादिनी वादक माझ्याशी बोलायला आला आणि तो मला म्हणाला, तो कलाकार तुला एवढा बोलत होता. तरीही तू गप्प राहून का ऐकून घेतलेस ? तुझ्या जागी इतर कुणी असते, तर त्याने त्याला चांगलेच ऐकवले असते. त्या कलाकाराच्या अशा वागण्यामुळे अनेकजण दुखावले गेले आहेत. त्याच्या अशा वर्तणुकीमुळे त्याला एका विद्यालयातूनही काढून टाकले होते.

– श्री. गिरीजय प्रभुदेसाई, म्हार्दोळ, गोवा. (१३.७.२०१६)

८. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे कलाकारांसाठी मार्गदर्शन

कलाकारांची ही दयनीय स्थिती पाहून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकूंची वाक्ये मला आठवली. जी कलाकारांच्या जीवनाला योग्य दिशा देऊन त्यांना व्यसनांपासून मुक्त होऊन आनंदी जीवन जगायला शिकवतील. त्या म्हणाल्या, संगीत साधनेने वैखरीतील वाणीपेक्षा अंतर्मनातील नादब्रह्माला जागृत करणे महत्त्वाचे आहे. नाहीतर संपूर्ण जीवन असेच गाण्यात व्यर्थ जाईल. आमच्याकडे काही साधक असे आहेत की, ज्यांना संगीत साधनेमुळे सुरांच्या देवतांची दर्शने झाली आहेत. नादब्रह्माच्या अनुभूती आल्या आहेत.

९. तबला हा टाळ्या मिळवण्यासाठी नाही, तर
ईश्‍वरासाठी वाजवायला हवा, याची प.पू. डॉक्टरांच्या कृपेने जाणीव होणे

आजपर्यंत मी टाळ्या मिळवण्यासाठी तबला वाजवला. कधीही ईश्‍वरासाठी वाजवला नाही. प.पू. डॉक्टरांच्या कृपाशीर्वादामुळेच मला याची जाणीव झाली. प.पू. डॉक्टरांनीच मला खर्‍या संगीताची (ईश्‍वराची) उपासना करायला शिकवली. नाहीतर आज मीही इतरांप्रमाणे मायेतील कलाकार होऊन अडकून पडलो असतो.

प.पू. डॉक्टर, आपणच मला योग्य मार्ग दाखवलात, यासाठी आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

– श्री. गिरीजय प्रभुदेसाई, म्हार्दोळ, गोवा. (१३.७.२०१६)

१०. कलाकार आणि साधक कलाकार यांच्यातील भेद

व्यवहारातील कलाकार साधक कलाकार
१. गायन शिकण्याचा उद्देश आवड म्हणून आणि मानसन्मान, पैसा मिळावा यासाठी केवळ देवासाठी किंवा देव मिळावा यासाठी गाणे
२. वर्तणूक अहंयुक्त नम्र
३. गाण्याचा उद्देश केवळ लोकांचे मनोरंजन करणे गाण्यातून स्वत: अनुभूती घेणे आणि ऐकणार्‍यांनाही
आध्यात्मिक अनुभूती देणे
४. इतरांकडून शिकण्याची वृत्ती नसणेे, ‘स्वतःचेच चांगले आहे’, असे वाटणेे ‘दुसर्‍या साधक कलाकाराकडून चांगले कसे घेता येईल’, असे शिकण्याच्या स्थितीत असणेे
५. आवाजात गोडवा नसणे साधनेने आवाजात चैतन्याचा गोडवा निर्माण होणे
६. श्रोत्यांवर होणारा परिणाम केवळ बाह्यत: कानाला सुख मिळणे श्रोत्यांना आध्यात्मिक अनुभूती येणे
७. एकमेकांविषयी आदर नसणे, स्पर्धा अन् इर्षा असणे एकमेकांविषयी आदर असणे
८. इतरांना संगीत शिकवणे मोकळेपणाने न शिकवणे, हातचे राखून शिकवणे आपल्याकडे जे आहे, ते सर्व ज्ञान शिष्याला देणे
९. आध्यात्मिक उन्नती न होणे आत्मोन्नती साधणे