दृष्ट काढल्याने होणारे लाभ

Article also available in :

या लेखात आपण ‘दृष्ट काढणे’ म्हणजे काय ?, दृष्ट काढल्याने होणारे लाभ, दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीवर दृष्ट निघण्याची फलनिष्पत्ती, दृष्ट काढण्याच्या प्रक्रियेत भावचे महत्त्व यांविषयी माहिती पाहू.

१. ‘दृष्ट काढणे’ म्हणजे काय ?

`व्यक्तीवर बाहेरच्या दिशेने होत असलेल्या सूक्ष्म अनिष्ट आक्रमणांमुळे त्या व्यक्तीला त्रास होत असतात. त्या त्रासांवर मात करण्यासाठी बाह्य मंडलातून योजलेल्या आध्यात्मिक उपाययोजनांपैकी एक म्हणजे ‘दृष्ट काढणे’. दृष्ट काढणे, ही पद्धत अवलंबिली असता व्यक्तीचा स्थूलदेह, मनोदेह आणि सूक्ष्मदेह यांवर आलेले रज-तमात्मक आवरण दूर होते.

एखाद्या व्यक्तीचा प्राणमयकोष आणि मनोमयकोष यांतील त्रासदायक स्पंदने दृष्ट काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये खेचून घेणे अन् नंतर ते पदार्थ जाळून किंवा विसर्जन करून ती त्रासदायक स्पंदने नष्ट करणे, याला `दृष्ट काढणे’ असे म्हणतात.

दृष्ट काढण्याच्या काही पद्धतींत दृष्ट काढण्यासाठी वापरलेले पदार्थ नंतर जाळले जातात किंवा विसर्जन केले जातात. दृष्ट काढण्याच्या अन्य पद्धतीही आहेत.

२. दृष्ट काढल्याने होणारे लाभ

अ. दृष्ट काढल्यामुळे व्यक्तीच्या देहातील मनःशक्ती
सबल होऊन कार्य करू लागल्याने व्यक्तीच्या कार्यात विघ्न न येणे

दृष्ट काढण्यातून व्यक्तीच्या देहावरील रज-तमात्मक आवरण वेळोवेळी दूर झाल्याने व्यक्तीच्या देहातील मनःशक्ती सबल होऊन कार्य करू लागते. यामुळे त्याच्या कार्यात विघ्न न येता, ते कर्मासहित पूर्ण करता येते.

आ. दृष्ट काढल्यामुळे दृष्ट लागण्याची किंवा करणीची तीव्रता कळणे

प्रत्येक पदार्थाच्या प्रकृतीप्रमाणे त्याचे गुणधर्मही निराळे असतात. कोणताही पदार्थ शक्यतो वाईट स्पंदनांचा परिणाम झाल्यामुळे त्याचा मूळ गुणधर्म सोडून त्याच्या उलट असणारा परिणाम दर्शवतो. दृष्ट काढण्यासाठी जे घटक (पदार्थ) वापरतात त्या घटकांवर वाईट स्पंदनांचा परिणाम झाल्यामुळे त्यांची विशिष्ट लक्षणे जाणवतात, उदा. मीठ-मोहरी यांनी दृष्ट काढल्यानंतर मीठ-मोहरी जाळल्यानंतर येणारा वास, ओवाळून टाकलेल्या मिरच्या जाळल्या असता येणारा मिरचीचा ठसका या विशिष्ट लक्षणांवरून दृष्ट लागण्याची तीव्रता कळते. दृष्ट लागण्याची तीव्रता कळल्यामुळे त्रास किती प्रमाणात आहे, हे कळते. यावरून दृष्ट काढण्याची वारंवारता वाढवता येते, तसेच दृष्ट काढण्यासाठी अधिक प्रभावी घटक वापरता येतो. त्रास लवकर न्यून (कमी) व्हावा; म्हणून दृष्ट काढण्यासह नामजप-साधना, संतसेवा यांसारखे अन्य प्रतिबंधात्मक उपायही लगेच अवलंबता येतात.

३. दृष्ट काढण्याच्या प्रक्रियेत भाव महत्त्वाचा

अध्यात्मात भावाला महत्त्व आहे आणि दृष्ट काढणे, ही एक आध्यात्मिक स्तरावरील प्रक्रिया असल्याने दृष्ट काढतांनाही भाव असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अ. दृष्ट काढली जाणाऱ्या व्यक्तीचा भाव कसा असावा ?

‘दृष्ट काढणारी व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष आपली उपास्यदेवता असून ती दृष्ट काढत असलेल्या घटकात माझ्या शरिराभोवतीचे सर्व त्रासदायक शक्तीचे आवरण, तसेच शरिरातील सर्व त्रासदायक शक्ती खेचून घेत आहे आणि माझ्याभोवती चैतन्याचे संरक्षककवच निर्माण करत आहे’, असा भाव दृष्ट काढली जाणाऱ्या व्यक्तीने ठेवावा.

आ. दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीचा भाव कसा असावा ?

‘मी स्वतः दृष्ट काढत नसून माझ्या ठिकाणी देवताच आहे आणि ती समोरच्या व्यक्तीची दृष्ट काढून तिच्या भोवतीचे त्रासदायक शक्तीचे आवरण, तसेच तिच्या शरिरातील त्रासदायक शक्ती दृष्ट काढण्याच्या घटकात खेचून घेत आहे’, असा भाव दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीने ठेवावा.

इ. दृष्ट काढतांना परस्परांनी भाव ठेवल्यामुळे होणारे लाभ

  • दृष्ट अल्प कालावधीत निघते.
  • देवतेचा आशीर्वाद मिळून दोन्ही व्यक्तींभोवती संरक्षक-कवच निर्माण होते. हे संरक्षक-कवच टिकण्याचा कालावधी व्यक्तीच्या भावावर अवलंबून असतो.

४. दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीवर दृष्ट
निघण्याची फलनिष्पत्ती अवलंबून असणे

साधना नसणाऱ्या सामान्य व्यक्तीने दृष्ट काढणे आणि आध्यात्मिक पातळी चांगली असणाऱ्या साधकाने दृष्ट काढणे यांमुळे होणारे सूक्ष्मातील परिणाम

  साधना नसणाऱ्या
सामान्य व्यक्तीने
दृष्ट काढणे
आध्यात्मिक पातळी चांगली
असणाऱ्या साधकाने दृष्ट काढणे
१. व्यक्तीची आध्यात्मिक  पातळी   २० टक्के   ५० किंवा ५० हून अधिक टक्के 
२. व्यक्तीचा अहं  
३० टक्के  १० ते १५ टक्के
३. व्यक्तीमधील स्पंदने

अ. भावना

आ. भाव

इ. शक्ती

  • १. मारक शक्ती
  • २. विघटन शक्ती

ई. चैतन्य

 

४ टक्के

 

२.२५ टक्के

१.२५ टक्के

 

२ टक्के

 ४. दृष्ट लागलेल्या व्यक्तीकडून प्रक्षेपित होणारी त्रासदायक शक्ती  ३ टक्के  –
 ५. परिणाम

अ. मनातील विचार

 

 

आ. दृष्ट लागलेल्या व्यक्तीकडून प्रक्षेपित होणाऱ्या त्रासदायक शक्तीचा परिणाम

 

मनात मायेचे विचार आणि भावनेचे प्रमाण अधिक असल्यामुळे आध्यात्मिक स्तरावर लाभ न होणे

 

त्रासदायक शक्तीचे आक्रमण होण्याची शक्यता अधिक असणे

 

मनात मायेच्या विचारांचे प्रमाण अल्प असल्यामुळे आध्यात्मिक स्तरावर लाभ अधिक होणे

 

ईश्वराशी सातत्याने अनुसंधान असल्यामुळे त्रासदायक शक्तीचा फारसा परिणाम न होणे

 ६. दृष्ट लागलेल्या व्यक्तीवर होणारा परिणाम

अ. तोटा

आ. लाभ

 

 

त्रास फारसा न्यून न होणे

अल्प प्रमाणात लाभ होणे
(टीप १)

 

 

आध्यात्मिक उपाय होऊन त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होणे आणि तो  परिणाम अधिक काळ टिकणे, तसेच व्यक्तीचा भाव जागृत होणे

टीप १ – दृष्ट काढणारी सामान्य व्यक्ती असली, तरी तिच्यातील तळमळीलाही महत्त्व असते, उदा. ‘आपल्या मुलाचा त्रास अल्प व्हावा’, अशी आईला तळमळ असते आणि त्या तळमळीने तिने दृष्ट काढल्यावर मुलाचा त्रास न्यून होतो.

निष्कर्ष

अ. वरील सारणीवरून लक्षात येते की, साधना नसणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीमध्ये भावनांचे प्रमाण अधिक असल्यामुळे तिच्यावर त्रासदायक शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यता अधिक असते. याउलट साधना केल्यामुळे अहंचे प्रमाण अल्प होऊन देहात दैवी शक्तींचा संचय अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे त्रासदायक शक्तीचे आक्रमण होण्याची शक्यता अगदी अल्प असते. यावरून साधना करणे आवश्यक का आहे, हे लक्षात येते.

आ. दृष्ट काढण्याची फलनिष्पत्ती वाढण्यासाठी दृष्ट काढणाऱ्याची आध्यात्मिक पातळी चांगली असणे आवश्यक आहे. आध्यात्मिक पातळी सर्वांचीच चांगली असते, असे नाही. पातळी अल्प असली, तरी भाव आणि तळमळ असणे अत्यंत आवश्यक असते. दृष्ट काढण्याच्या प्रक्रियेत प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप यांना म्हणूनच विशेष महत्त्व आहे.

दृष्ट काढल्यावर त्रास अल्प होतो; परंतु त्रास देणारी वाईट शक्ती जास्त क्षमतेची असल्यास त्रास पुनःपुन्हा होतो. तसेच सध्याच्या कलियुगातील वायूमंडलच तमोगुणी विचारांनी ग्रासलेले असल्याने प्रत्येक जिवाला कोणाची ना कोणाची तरी दृष्ट लागतच असते. यावर उपाय म्हणजे, दृष्ट पुनःपुन्हा काढणे. दृष्ट पुनःपुन्हा काढण्याला मर्यादा आहेत. यावर उपाय म्हणजे, आपली अशी स्थिती निर्माण करणे की, वाईट शक्तींच्या आक्रमणांचा किंवा तमोगुणी स्पंदनांचा आपल्यावर परिणामच होणार नाही. आपल्याभोवती सात्विकतेचे अभेद्य कवच निर्माण झाल्यावरच हे शक्य होते. सात्विकतेचे अभेद्य कवच केवळ योग्य मार्गाने केलेली साधना आणि गुरुकृपा यांमुळे निर्माण होते. यासाठी जीवनात साधनेला पर्याय नाही, हे लक्षात घ्या.

संदर्भ :  सनातन-निर्मित ग्रंथ ‘दृष्ट काढण्याचे प्रकार (भाग १)’