साधनेतील प्रयत्नांमधून श्रीकृष्णाने साधिकेला दिलेल्या अनुभूती दर्शवणारी कृष्णमय चित्रे (भाग ४)

११. गोपीभावाचा उच्च स्तर गाठणे पुष्कळ कठीण असल्यामुळे
भगवान श्रीकृष्णाने सनातनच्या गोपींची दास्यभक्ती करण्यास सुचवणे

balak_bhav_1_C20_1_b
 

११ अ. चित्राचे विवरण

१. ‘साधनेत पुढे जायचे असेल, तर ‘बालकभावा’पेक्षा गोपीभाव अधिक महत्त्वाचा’, अशी टिपणी लिहून प.पू. डॉक्टरांनी नकळत वाढलेल्या अहंभावाची जाणीव करून देणे

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील कु. ललिता वाघ हिच्या ‘बालकभाव’ वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांविषयीच्या लेखात प.पू. डॉक्टरांनी ‘साधनेत पुढे जायचे असेल, तर ‘बालकभावा’पेक्षा गोपीभाव अधिक महत्त्वाचा’, अशी टिपणी लिहिली होती. यापूर्वी मी रेखाटलेली चित्रे इतरांना (आता मी ते थांबवले आहे.) दाखवणे मला आवडायचे आणि ती पाहून त्यांनी ‘माझे कौतुक करावे’, अशी सुप्त इच्छा मनात असायची. या सुप्त इच्छेमुळेच माझा अहंभाव नकळत वाढत असल्याचे प.पू. डॉक्टरांची टिपणी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आले. तेव्हापासून ती टिपणी माझा अहंभाव अल्प करण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी ‘तारक मंत्र’ ठरली आहे.

२. गोपीभावाचा उच्च स्तर गाठणे पुष्कळ कठीण असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाने सनातनच्या गोपींची दास्यभक्ती करण्यास सुचवणे

गोपीभावाचा उच्च स्तर गाठणे पुष्कळ कठीण असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाने मला सनातनच्या गोपी वृषाली कुंभार, दीपाली मतकर आणि तृप्ती गावडे यांची दास्यभक्ती करण्यास सुचवले. या चित्रामध्ये गोपींना केसात घालण्यासाठी फुले देणे (चित्र १), त्या प्रसाद ग्रहण करतांना त्यांना पाणी देणे (चित्र २), त्या प्रसारासाठी जात असतांना त्यांच्या सपाता (चपला) स्वच्छ करून सिद्ध ठेवणे (चित्र ३) आणि त्या झोपल्या असतांना त्यांचे हात हळूवारपणे चेपणे (चित्र ४), अशा कृती करून मी गोपींप्रती दास्यभक्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

३. श्रीकृष्णाच्या सगुण किंवा निर्गुण स्वरूपाची सेवा करण्यापेक्षा त्याच्या उत्कट भक्तांची सेवा केल्याने त्याला अधिक आनंद होणे

माझ्या एका चित्रामध्ये मी श्रीकृष्णाचे पाय चेपत असतांना त्याला आनंद होत असल्याचे जाणवले. नंतर दुसर्‍या चित्रामध्ये प.पू. डॉक्टरांचे पाय चेपत असतांना श्रीकृष्णाला अधिक आनंद झाल्याचे जाणवले अन् या चित्रामध्ये मी गोपींचे हात चेपत असतांना त्याला अत्यानंद होत असल्याचे जाणवले. श्रीकृष्णाच्या सगुण किंवा निर्गुण स्वरूपाची सेवा करण्यापेक्षा त्याच्या उत्कट भक्तांची सेवा केल्याने त्याला अधिक आनंद होतो. अशाप्रकारे श्रीकृष्ण माझा अहं अल्प करण्यास साहाय्य करत आहे. मला सतत त्याच्या भक्तांकडून शिकण्याच्या स्थितीत ठेवून माझ्यामध्ये निरपेक्ष प्रेमभाव वाढवत आहे.’

– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२८.२.२०१३)

११ आ. चित्राचे वैशिष्ट्य

‘बालगोपीला सेवाभावाचे बाळकडू पाजून भगवंताने तिच्यात दास्यभक्तीचा उदय केला आणि तिच्याकडून भक्तांची सेवा करवून घेतली. यामुळे बालगोपीच्या चित्तावर अहंविरहित भक्तीचा संस्कार दृढ होऊन मधुराभक्तीच्या कृष्णमंदिराचा पाया भक्कम झाला.’ – (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १८.७.२०१३, रात्री १०.५०)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग १) (कृष्णभक्तीचा आनंद देणारी चित्रे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह)’

Leave a Comment