हिंदु धर्मात स्वर्गाच्याही पुढच्या लोकांत जाण्याची संधी असून ती व्यक्तीच्या कर्मफलन्यायावर अवलंबून असणे

७.११.२०१४ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये स्वर्गात जाण्यासाठी येशूला शरण जाणे हा एकमेव मार्ग ! असा फोंडा (गोवा) येथे मेगाफोनच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्माचा प्रसार एक व्यक्ती करत होती, असे वाचनात आले. त्या ख्रिस्ती धर्मप्रसारकाने ख्रिस्ती धर्म श्रेष्ठ आहे, हे दर्शवण्यासाठी हिंदु धर्मावर केलेल्या टिकेचे खंडण पुढे देत आहे.

१. ख्रिस्ती धर्मप्रसारक : मूर्तीमध्ये सामर्थ्य नाही. पूजापाठ करून सत्य सापडत नाही. स्वर्गात जाण्यासाठी येशूला शरण जाणे, हा एकमेव मार्ग. अन्य कोणताही मार्ग नाही.

खंडण : अशी विधाने वाचल्यावर ख्रिस्त्यांना विचारावेसे वाटते, वरील विधान हे हिंदु धर्मियांच्या मूर्तीविषयी आहे. जर मूर्तीमध्ये सामर्थ्य नाही, असे म्हणता, तर गोव्यात ठिकठिकाणी खांबावर उभ्या केलेल्या अवस्थेत असलेल्या येशूच्या मूर्तीत कोणते सामर्थ्य आहे ?, हे स्पष्ट करावे. ती मूर्ती स्थापन करण्यामागे ख्रिस्ती लोकांचा काय उद्देश आहे ? तसेच पूजापाठ करून सत्य सापडत नाही, असे म्हणता, तर बर्‍याच ठिकाण येशूच्या मूर्तीला फुले वाहिलेली असतात. त्यांच्यासमोर मेणबत्त्या पेटवलेल्या असतात, तसेच त्यांची स्तुती करणारे वाचन केले जाते. ते कशासाठी ? तसेच प्रार्थना करणे आणि क्षमा मागणे या कृतीही पूजापाठच आहेत.

२. ख्रिस्ती धर्मप्रसारक : मनुष्याने हाताने बनवलेल्या मूर्तीमध्ये एवढे सामर्थ्य कसे काय येऊ शकते ?

खंडण : तुम्ही येशूची मूर्ती कशा प्रकारे बनवली आहे ?, हे जनतेला सांगावे. येशूच्या मूर्ती आपोआप सिद्ध होतात का ?

३. ख्रिस्ती धर्मप्रसारक : कीर्तन, भजन, तीर्थयात्रा, पूजापाठ करून सत्य सापडत नाही.

खंडण : अशी खोटी आरोळी ठोकून तुम्ही जनतेला फसवता, हे स्पष्ट आहे. येशूला भजल्यानंतर एखाद्या व्यक्तीने केलेली पापे येशूकडे मांडली जातात आणि त्यासाठी क्षमायाचना केली जाते. तेव्हा येशू त्याला क्षमा करतो, हे तुम्हाला कसे समजते ? ते तुम्ही सांगू शकता का ?

४. ख्रिस्ती धर्मप्रसारक : माणसाला स्वर्गात नेऊ शकतो, असे एकच नाव आहे आणि स्वर्गात जायला दुसरा कोणताही मार्ग नाही.

खंडण : स्वर्गाच्याही पुढे काय आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? तुम्ही सर्वांना स्वर्गात घेऊन जाणार म्हणता. स्वर्गात जाण्यासाठी आमिषे दाखवता, हे तुमचे अतिशय संकुचित ध्येय आहे. स्वर्गाच्या पुढचेही लोक, म्हणजे महर्, जन, तप, सत्य अशा उच्च लोकांपर्यंत जाण्याचे मार्ग व्यापक अशा हिंदु धर्मात सांगितले आहेत. तिथपर्यंत आम्हाला जायचे असल्याने आम्ही तुम्ही सांगितलेल्या मार्गाने जायचा प्रश्‍नच येत नाही.

५. ख्रिस्ती धर्मप्रसारक : तीन दिवस आणि तीन रात्र मेलेल्या येशूला त्याच्या परमेश्‍वर वडिलांनी जिवंत केले आहे.

खंडण : मृत्यू पावलेल्या येशूला जिवंत करणारा खरा परमेश्‍वर कोण ? येशू कि त्याचे वडील ?, हे समजत नाही. याउलट हिंदु धर्मातील देवता ही एक शक्ती आहे आणि ती सर्वत्र कार्यरत असते.

– एक साधिका, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.११.२०१४)

धर्मांतरित झाल्यावर हिंदु धर्माला
तुच्छ लेखणार्‍यांनो, तुमचा जन्म हिंदु धर्मात
का झाला ?, याचा गांभीर्याने विचार करा !

ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारी व्यक्ती मूळची हिंदु असून आता ख्रिस्ती झाली आहे. हिंदु धर्मावर आधारित असलेले विधी आणि हिंदु धर्माला तुच्छ लेखून ख्रिस्ती धर्म कसा श्रेष्ठ आहे, हे ती व्यक्ती सांगत आहे; पण त्या व्यक्तीने स्वतःचा जन्म कोणत्या धर्मात झाला ? आपण लहानाचे मोठे कुठे झालो ?, याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा. जर येशू श्रेष्ठ आहे, तर हिंदु धर्मात तुमचा जन्म का झाला ?, याचा अभ्यास करावा.

स्वर्गात जाण्यासाठी आमिषे दाखवून फसवणूक करणे बंद करा !

कोणत्याही धर्माचा अभ्यास न करता लोकांना तथ्यहीन विचार सांगून फसवणे, हे महापाप आहे, हे ख्रिस्ती लोकांनी लक्षात ठेवावे आणि यापुढे स्वर्गात जाण्यासाठी आमिषे दाखवण्याचे बंद करावे. तुम्ही बळजोरी करू शकत नाही, हे लक्षात ठेवावे.

– एक साधिका, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.११.२०१४)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात