समावर्तन (सोडमुंज)

१. व्याख्या

ब्रह्मचर्यव्रत धारण केलेल्या विद्यार्थ्याने गुरुगृहातून स्वगृही परत येणे, यास ‘समावर्तन’ किंवा ‘सोडमुंज’, असे म्हणतात.

 

२. विधी

या वेळी पुढील गोष्टी मंत्रपूर्वक करतात – वस्त्रधारण, काजळधारण, कुंडलधारण, पुष्पमालाधारण, जोडाधारण, छत्रधारण, दंडधारण आणि सुवर्णमणीधारण. आता मुलगा गृहस्थाश्रमात परत येणार असल्याने गृहस्थाप्रमाणे रहाणे त्याला या विधीद्वारे शिकविले जाते.

 

३. सोडमुंज आणि मुंजा

‘ब्रह्मचारी मृत झाल्यास त्याचा मुंजा समंध होण्याची शक्यता असल्यामुळे त्याची सोडमुंज करण्याची गडबड करतात; पण ब्रह्मचारी मृत झाला, तरी त्याची अंत्येष्टी करण्यापूर्वी त्याचे समावर्तन होऊन अर्कविवाह होऊन लगेच पुढील अंत्येष्टी करतात.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सोळा संस्कार’