
मथुरा (उत्तरप्रदेश) – सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथील ब्रिजलक्ष्मी धाममध्ये रहाणार्या मुलांमध्ये चांगल्या मूल्यांचे संवर्धन करता यावे, यासाठी ५ दिवसांच्या ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गा’चे आयोजन करण्यात आले. या वर्गात ४ ते १४ वर्षे या वयोगटातील अनेक मुलांनी सहभाग घेतला. सनातनच्या साधिका कु. पूनम चौधरी आणि कु. मनीषा माहूर यांनी या वर्गात मार्गदर्शन केले. या वर्गात मुलांना नामजप कसा करावा ? नमस्कार कसा करावा आणि स्वतःतील सद्गुण कसे वाढवावेत, हे प्रात्यक्षिकांसह शिकवण्यात आले. यासह त्यांना राष्ट्रपुरुष, महान संत आणि ऋषिमुनी यांच्याविषयी माहितीही सांगण्यात आली.

या वर्गामध्ये काव्यवाचन, चित्रकला आणि प्रश्नोत्तर स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याद्वारे मुलांमध्ये धर्माविषयी जागृती करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्या मुलांना जोधपूर (राजस्थान) येथील पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. वर्गाची सांगता ‘संपूर्ण वन्दे मातरम्’ने झाली.


वैशिष्ट्यपूर्ण
१. पालकांनी सांगितले की, या वर्गांना उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या मुलांमध्ये लक्षणीय पालट झाले आहेत. ते घरी स्वतःहून नामजप करू लागले आहेत.
२. एका मुलाने त्याच्या पालकांना सांगितले की, सनातन संस्थेला भविष्यात कोणताही कार्यक्रम आयोजित करायचा झाल्यास ते त्यांच्या घरी आयोजित करू शकतात.
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
सनातन संस्था आयोजित बालसंस्कारवर्ग ‘मुलांवर संस्कार करणे आणि त्यांचे चारित्र्य घडवणे’ यांसाठी अत्यंत प्रभावी ठरलेले...
सनातनच्या बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून आदर्श आणि सुसंस्कृत पिढीची निर्मिती ! – पालक