स्वरोदयशास्त्र मानसिक असंतुलनावरही परिणामकारक असणे

P_Mukul_Gadgil
पू. डॉ. मुकुल गाडगीळ

मनाची अस्वस्थता, चिडचिड होणे, विनाकारण पुष्कळ राग येणे, अशा मनाच्या अवस्थेवर उपाय विचारण्यासाठी माझ्याकडे काही साधक आले होते. तेव्हा त्यांच्यावर स्वरोदयशास्त्राचा काय परिणाम होतो, हे पाहूया, असा विचार देवाने मला दिला. मी त्यांना आता तुमची कोणती नाडी चालू आहे ?, हे विचारले. आश्‍चर्य म्हणजे सर्वांची सूर्यनाडी, म्हणजे उजव्या नाकपुडीने श्‍वास चालू होता. मी त्यांना उजव्या कानात कापसाचा बोळा घालायला सांगितले. यामुळे सूर्यनाडी बंद होऊन चंद्रनाडी, म्हणजे डाव्या नाकपुडीने श्‍वास चालू होतो, असे स्वरोदयशास्त्रात सांगितले आहे. त्या सर्व साधकांनी हा उपाय केल्यावर ५ – १० मिनिटांतच सर्वांना लाभ झाला आणि त्यांच्या मनाची चिडचिड थांबून मन शांत झाले. स्वरोदयशास्त्रानुसार केलेल्या या उपायामागचे शास्त्र असे आहे की, सूर्यनाडी चालू असल्यामुळे आपण जो श्‍वास घेतो, त्यातील प्राणामध्ये शक्ती, म्हणजे उष्णता प्रवाहित होते. यामुळे अशांत मन अधिक अशांत होते. जसे आगीत तेल ओतले की, आग अधिकच भडकते, तसे हे आहे. याउलट चंद्रनाडी ही शीतल असल्याने त्या नाडीने श्‍वास चालू झाल्यास शीतल प्राणामुळे अशांत मन शांत होते.

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१७.२.२०१६)

मनाची अशांतता, चिडचिड होणे, विनाकारण राग येणे
अशा मानसिक त्रासांवर चंद्रनाडी चालू करणे, हा उपाय करा !

मन अशांत झाले असेल, मनाची चिडचिड होत असेल किंवा विनाकारण राग येत असेल, तर अशा मानसिक त्रासांवर स्वरोदयशास्त्रानुसार आपली चंद्रनाडी चालू करावी. त्यासाठी उजव्या कानात कापसाचा बोळा घालणे किंवा / आणि उजव्या कुशीवर झोपणे, असे उपाय करावेत. हे उपाय करतांना आपला नेहमीचा नामजपही प्रयत्नपूर्वक चालू ठेवावा. यामुळे स्वरोदयशास्त्रानुसार केलेल्या उपायाचा अधिक परिणामकारक लाभ होईल आणि मानसिक त्रासांतून लवकरात लवकर सुटका करून घेता येईल. – (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१७.२.२०१६)

संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ स्वरोदयशास्त्रानुसार उपाय