स्वरोदयशास्त्रानुसार उपाय केल्यावर आलेली अनुभूती

पू. गाडगीळकाकांनी मला स्वरोदयशास्त्रानुसार उजव्या कुशीवर झोपण्यास आणि उजव्या कानात कापसाचा बोळा घातल्यास चंद्रनाडी चालू होऊन रक्तदाब न्यून होईल, असे सांगितले.

स्वरोदयशास्त्र मानसिक असंतुलनावरही परिणामकारक असणे

मन अशांत झाले असेल, मनाची चिडचिड होत असेल किंवा विनाकारण राग येत असेल, तर अशा मानसिक त्रासांवर स्वरोदयशास्त्रानुसार आपली चंद्रनाडी चालू करावी.

रोगनिवारणासाठी शिव-स्वरोदयशास्त्राचे महत्त्व

रोगनिवारण्यासाठी शिव-स्वरोदयशास्त्राचे (शिवाने सांगितलेले स्वराचे, म्हणजे श्वासाच्या नियमनावरील शास्त्राचे) महत्त्व येथे पाहूया.