
मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील गणेशरा भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ‘विशाल हिंदु परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

या प्रदर्शनाचा २०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. या परिषदेला भागवत कथाकार पू. अनिरुद्धाचार्य यांची वंदनीय उपस्थिती होती. या वेळी सनातन संस्थेच्या साधिका कु. पूनम किंगर यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग २०२६’ अन् ‘पाक्षिक सनातन प्रभात’ भेट म्हणून दिले.

पू. अनिरुद्धाचार्य यांना हे दोन्ही अतिशय आवडले, तसेच त्यांनी सनातनच्या साधकांना त्यांच्या गौरी गोपाल आश्रमात येण्याचे निमंत्रण दिले.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !