देहली येथे सनातन संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

व्याख्यान ऐकतांना विद्यार्थी

देहली – सनातन संस्थेच्या वतीने येथील ‘शहीद भाई मुकुंद सर्वाेदय विद्यालया’मध्ये ‘विद्यार्थी जीवनात नामजपाचे महत्त्व’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या संगीता गुप्ता आणि सौ. मणी मुंजाल यादव यांनी ‘विद्यार्थीदशेत नामजप केल्याने होणारे लाभ, एकाग्रता कशी निर्माण करावी ?, धर्मानुसार कोणता नामजप करावा ?’, या विषयांवर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला.

Leave a Comment