
प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता) – ‘शास्त्र धर्मप्रचार सभा’ या संघटनेने आयोजित केलेल्या माघ-मेळा वार्षिक अधिवेशनात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘गंगानदीचे माहात्म्य आणि गंगा नदीत स्नान कसे करावे ?’, याविषयी मार्गदर्शन केले. अलोपी बाग मार्ग, सेक्टर ६ येथे आयोजित या अधिवेशनात १०० हून अधिक भाविकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

या वेळी श्री. राजहंस म्हणाले की, कुठलीही धार्मिक कृती करतांना त्यामागील अध्यात्मशास्त्र जाणून घेतले, तर ती कृती करतांना भाविकाचा भाव वृद्धींगत होतो आणि त्याचा त्याला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. त्याचप्रमाणे गंगास्नानाचेही शास्त्र समजून गंगास्नान केले, तर त्याचा भाविकांना निश्चितपणे लाभ होईल.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !