मंत्रजपामुळे डोळ्यांचे दुखणे थांबणे

वेगवेगळ्या वैद्यांकडून अनेक तपासण्या करूनही डोळे
दुखण्याचे निदान न होणे, संतांनी दिलेला मंत्रजप भ्रमणभाषवर
ध्वनीमुद्रित करण्यात  अडथळे येणे आणि नंतर ते दूर होऊन डोळ्यांचे दुखणे थांबणे

श्री. सुरेश कदम
श्री. सुरेश कदम

जानेवारी २०१५ पासून माझे डोळे दुखत होते. वेगवेगळ्या वैद्यांमार्फत अनेक तपासण्या करून झाल्या. त्यांनी काही झाले नाही, असे सांगितले. माझ्या आजाराचे निदान होत नव्हते. एकदा एका संतांची भेट झाली. त्यांनी माझी विचारपूस केली. तेव्हा मी डोळे दुखत असल्याचे सांगितले. त्या संतांनी एका साधिकेला एका संतांना याविषयी विचारायला सांगितले. त्या संतांनी लगेच संगणकीय पत्राद्वारे, तसेच ध्वनीमुद्रित करून मंत्र पाठवला.

तो मंत्रजप भ्रमणभाषवर ध्वनीमुद्रित करून घेण्यास पुष्कळ अडथळे आले. वेगवेगळे भ्रमणभाष आणले; पण त्यात मंत्र ध्वनीमुद्रित होत नव्हता. ध्वनीमुद्रित झालेले पुसले जायचे. असे १२ दिवस झाले. मग देवाला प्रार्थना केली, देवा, तूच काय ते बघ. त्यानंतर मंत्र भ्रमणभाषवर ध्वनीमुद्रित (रेकॉर्ड) झाला. तेव्हापासून मंत्रजप करणे चालू केले. नंतर मला चक्कर यायला लागली. दुसर्‍या दिवशी देवानेच जाणीव करून दिली की, हा मंत्रजपातील अडथळा आहे. त्याही अवस्थेत मंत्रजप चालू केला. मंत्रजपामुळे माझे डोळ्यांचे दुखणे थांबले. त्यासाठी प.पू. गुरुदेव आणि संत यांच्या चरणी कृतज्ञ आहे. ऋषीमुनींनी सांगितलेल्या मंत्राचे सामर्थ्य आणि संतांचा संकल्प यांचे महत्त्व माझ्या लक्षात आले.

– श्री. सुरेश कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२५.४.२०१५)

प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात