सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !

‘सनातन संस्था’ ही अध्यात्माचा वैज्ञानिक भाषेत प्रसार करणारी संस्था आहे. सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसाराच्या निमित्त विविध ठिकाणी प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने आयोजित केली जातात.

साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सध्या संपूर्ण जग आपत्काळाच्या उंबरठ्यावर आहे. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारखी रोगराई यांसारख्या विविध माध्यमांतून आपत्काळ कधीही येऊ शकतो. आजवर देवाने आपली साधना होण्यासाठी हा काळ थोपवून धरला आहे; पण तो आज ना उद्या येणारच आहे.

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून सनातनने प्रसिद्ध केलेले ‘बालसंस्कार’ या ग्रंथमालिकेतील, तसेच अन्य ग्रंथ दिल्यास त्यांच्या मनावर सुसंस्कारांचे महत्त्व बिंबण्यास साहाय्य होईल. ‘व्यावहारिक जीवनात यशस्वी बनण्यासह गुणी अन् आदर्श होण्यासाठी काय करावे ?’, याविषयीची अमूल्य माहिती या ग्रंथांत दिली आहे.

अधिकमास

अधिक मास किंवा ‘पुरुषोत्तम मास’ या मासात करावयाची व्रते अन् ती करण्यामागील शास्त्र जाणून घेऊया. अधिकमास म्हणजे पुण्यकारक कृत्ये करण्याचा काळ

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !

अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव ‘कृतज्ञताभावा’ने विविध आध्यात्मिक उपक्रमांच्या आधारे भारतभर साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ३१ ठिकाणी प्रभु श्रीरामाला ‘रामराज्य’ येण्यासाठी साकडे घालण्यात आले आणि राष्ट्र अन् धर्म यांसाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन संस्कार’ प्रशिक्षणवर्गाचे आयोजन !

सध्या शाळांना उन्हाळी सुट्या असल्याकारणाने पालकांना आपल्या पाल्यांच्या वेळेचा सदुपयोग कसा होईल ? असा प्रश्न पडतो. यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन संस्कार’ प्रशिक्षणवर्गाचे आयोजन पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात येत आहे.

सनातन आश्रमात मी अद्भुत अनुभूती घेतली ! – श्री भगवत शरण महंत राधाकृष्ण स्वामी

…सनातन धर्माचे खरे योद्धा डॉ. आठवले आहेत. सनातनच्या आश्रमात मी जी अद्भूत अनुभूती घेतली, तशी अनुभूती मी जीवनात कधीच घेतली नाही. येथे कुठेच दिखावा नाही, हे एक नैसर्गिक वास्तव आहे, असे आशीर्वचन ‘नॅशनल सोसायटी फॉर हरे कृष्णा कॉन्सिअसनेस’ (नॅशकॉन) चे व्यवस्थापकीय अध्यक्ष श्री भगवत शरण महंत राधाकृष्ण स्वामी यांनी गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर दिले.

१२ ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम असलेल्या मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश सनातन संस्थेला अर्पण !

तंजावर येथील वेदप्रचाररत्न वेदकुलपती जी.के. सीतारामन्गुरुजी यांनी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांपैकी ४ दिव्य अंश सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी केले अर्पण ! सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या ४ दिव्य अंशांचे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात आगमन !

व्यसन आणि व्यसनमुक्तीसाठी मानसोपचार आणि आध्यात्मिक स्तरावरील उपचार

व्यसनमुक्ती हा केवळ औषधांचा विषय नसून तो मनाच्या पुनर्रचनेचा आणि आध्यात्मिक त्रासांचा विषय आहे. आधुनिक विज्ञान शरिरावरील उपचार करील; पण अध्यात्मशास्त्र मनाचा कायापालट करील. नामजप, स्वयंसूचना आणि सात्त्विक जीवनशैली यांच्या समन्वयातून आपण एक व्यसनमुक्त, सुदृढ आणि आनंदी समाज घडवू शकतो.

भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्‍वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !

या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ आणि मंदिर विश्वस्त यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने भारताचा सर्वांगीण विकास आणि शत्रूंच्या नाशासाठी सामूहिक प्रार्थना केली.