जयपूर येथे पार पडलेल्या श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती रथयात्रेच्या समारोप सोहळ्यात श्रीचितशक्ती (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती अभियानांतर्गत संयुक्त भारतीय धर्म संसदेच्या वतीने चार रथयात्रांचे आयोजन करण्यात आले

अन्य मान्यवरांसह हवामहल मतदारसंघाचे आमदार आणि ‘हाथोज धाम’चे महंत स्वामी बालमुकुंदाचार्य यांच्या हस्ते श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे प्रतिनिधी म्हणून सन्मान स्वीकारतांना श्री. आनंद जाखोटिया

जयपूर (राजस्थान) – ‘संयुक्त भारतीय धर्म संसदे’च्या वतीने श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती अभियानाच्या अंतर्गत द्वारका, बद्रीनाथ, रामेश्वरम् आणि जगन्नाथपुरी येथून मथुरापर्यंत अशा ४ रथयात्रा काढण्यात आल्या होत्या. या रथयात्रांचा सांगता समारंभ येथील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’ येथे नुकताच पार पडला. या अभियानामध्ये सहयोग करणार्‍यांचा सन्मान करण्यात आला. हवामहल मतदारसंघाचे आमदार आणि ‘हाथोज धाम’चे महंत स्वामी बालमुकुंदाचार्य अन् सिव्हिल लाईन्स मतदारसंघाचे आमदार गोपाल शर्मा यांनी या वेळी ‘जन्मभूमीमुक्ती आणि हिंदूसंघटनाची आवश्यकता’ या संदर्भात उपस्थितांना संबोधित केले. या वेळी ‘श्रीकृष्णम्’ या काव्य ग्रंथाचे रचनाकार डॉ. कैलाश परवाल ‘सरल’, महंत दीपक वल्लभ गोस्वामी, मेहंदीपूर बालाजी मंदिराचे श्री. सुदीप तिवारी, एच्.सी. गणेशिया, पंडित मुकेश भारद्वाज, विश्व हिंदु परिषदेचे प्रांतीय मंत्री राधेश्याम गौतम, हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, हिसार (हरियाणा) येथील भाजप प्रदेशाध्यक्ष  रामफल शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करतांना आचार्य राजेश्वर (डावीकडे) आणि (उजवीकडून) आमदार बालमुकुंदाचार्यजी, महंत दीपक गोस्वामी अन् अन्य मान्यवर

‘संयुक्त भारतीय धर्म संसदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य राजेश्वर म्हणाले, ‘‘या अभियानाच्या कालावधीत लहान-मोठे ४०० कार्यक्रम आयोजित केले होते. भविष्यात हे अभियान देशभरात राबवण्याचा आमचा संकल्प आहे.’’ मेहंदीपुर बालाजी मंदिराचे महंत डॉ. नरेश पुरीजी महाराज यांच्या संदेशाचे वाचन त्यांचे प्रतिनिधी श्री. सुदीप तिवारी यांनी केले.

शुभसंदेशाचे वाचन करतांना श्री. आनंद जाखोटिया
मार्गदर्शन करतांना आचार्य राजेश्वर
कार्यक्रमाला उपस्थित जनसमुदाय

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती अभियानाच्या संदर्भात दिलेला शुभसंदेश !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

या कार्यक्रमात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनीही श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती अभियानासंदर्भात शुभसंदेश दिला होता. या शुभसंदेशाचे वाचन त्यांच्या वतीने या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले त्यांचे प्रतिनिधी श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. याप्रसंगी प्रतिनिधी म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी संदेशात म्हटले, ‘‘जगन्नाथपुरी ते मथुरापर्यंत २१०० कि.मी.ची संकल्पमय यात्रा पूर्ण करणे आणि मूळ गर्भगृहाची पूर्ण मुक्ती अन् भव्य मंदिरनिर्मिती होईपर्यंत पुन्हा दर्शन न घेण्याचा आयोजकांचा कठोर संकल्प धर्मरक्षणाच्या इतिहासात दिव्य प्रेरणापुंज आहे. हे आंदोलन केवळ एका स्थानाची मुक्ती नाही, तर ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या दिशेने अग्रेसर असलेल्या सनातन आत्म्याच्या पुनर्जागृतीचा महायज्ञ आहे.’’