पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्ववाद्यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

1
डावीकडून श्री. सुब्रत सामल, सदस्य, भारतीय गोसंवर्धन आणि अनुसंधान संस्थान, खोरधा, ओडिशा; श्री. अजीत रथ, सदस्य, गोसेवा धाम, खोरधा, ओडिशा; अधिवक्ता बिभूति भूषण पलेई, जिल्हा सचिव, प्रज्ञान क्रियायोग मिशन, सुंदरगड, ओडिशा; श्री. जयराज ठाकुर, संस्थापक सदस्य, हिन्दू सेना, सुंदरगड, ओडिशा; श्री. नीलकंठ महान्ती, ओडिशा राज्य सामाजिक समरसता विभाग सेवक, विश्‍व हिंदु परिषद, सुंदरगड, ओडिशा; श्री. प्रेम प्रकाश कुमार, सुंदरगड, ओडिशा; श्री. संदीप दास, जिल्हा संयोजक, राजगंगपूर, बजरंग दल, सुरेंद्रनगर, ओडिशा; अधिवक्ता सुरेशचंद्र पंडा, राज्य अध्यक्ष, बिश्‍वो गो सुरख्या बाहिनी, कटक, ओडिशा आणि दैनिकाविषयी माहिती सांगतांना सनातनच्या कु. दीपा तिवाडी

 

2
डावीकडून महेंद्र के.सी. शिवसेना अध्यक्ष संयोजक नेपाळ-भारत शाखा, नेपाळ; कुरु ताई, पापूम परे, अरुणाचल प्रदेश आणि सनातनच्या सौ. सावित्री इचलकरंजीकर

 

3
डावीकडून अधिवक्ता बी. राजेश्‍वर राव, कार्यकारी सदस्य, अधिवक्ता परिषद, भाग्यनगर, तेलंगण; अधिवक्ता के.वि. रमणमूर्ती, रंगा रेड्डी, तेलंगण; श्री. गोपी किशन पसुलोटी, जिला प्रमुख (इंदूर), शिवसेना, इंदूर, तेलंगण; श्री. शिव नारबोयिन,जिला कार्यदर्शी, संस्कृतभारती, नालगोंडा, तेलंगण आणि सनातन नियतकालिकांविषयी माहिती सांगतांना सौ. सौम्या कुदरवळ्ळी

 

4
डावीकडून सूक्ष्म-जगत प्रदर्शनाविषयी माहिती सांगतांना डॉ. पांडुरंग मराठे; महंत इच्छागिरी महाराज, धाराशीव, महाराष्ट्र; श्री. बापू ढगे, उपाध्यक्ष, भावसार समाज महाराष्ट्र, सोलापूर; श्री. अरुण महाजन, सचिव, सीताराम महाजन प्रतिष्ठान, नांदेड, महाराष्ट्र आणि श्री. संजय चव्हाण, नांदेड, महाराष्ट्र

 

आश्रमदर्शन केलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

 सनातनची निर्भीड पत्रकारिता मला फार आवडली !

आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. सनातनची निर्भीड पत्रकारिता मला फार आवडली. पुष्कळ विरोध असूनही तुम्ही परखड मत मांडत असता. – श्री. अंबरीश न. नाडकर्णी (भाजप कार्यकर्ता), गोवा. (१८.६.२०१६)

आश्रम पाहून हिंदु राष्ट्राची संकल्पना साकार होत आहे, असे जाणवले !

सनातन संस्थेचा रामनाथी, गोवा येथील आश्रम पाहून हिंदु राष्ट्राची संकल्पना साकार होत आहे, असे जाणवले. आता तो दिवस दूर नाही की, ज्या दिवशी देहलीच्या लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकेल ! साधकांचा राष्ट्र आणि धर्म यांच्या सेवेत मनापासून असलेला सहभाग आणि तत्परताच हिंदु राष्ट्राची स्थापना करील ! – बसंतसिंह गहलोत (दादा), जयपूर, राजस्थान. (८.८.२०१५)