‘फ्रेंडशिप डे’ : या पाश्‍चात्त्य विकृतीला का बळी पडू नये ?

हिंदु युवांनो, ‘फ्रेंडशिप डे’सारख्या पाश्‍चात्त्य विकृतीला
बळी पडू नका, तर धर्मशिक्षण घेऊन हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण करा !

ऑगस्ट मासाच्या पहिल्या रविवारी युवा वर्गाकडून फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या वर्षी फ्रेंडशिप डे ३ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. मैत्रीदिनाच्या नावाखाली या दिवशी मित्रमंडळींना मेजवानी देणे, मैत्रीचे प्रतीक म्हणून एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर होतात. शाळा-महाविद्यालये यांतून त्याचे प्रमाण लक्षणीय असते. असे एखादा बँड बांधून खरोखरच मैत्री वृद्धींगत होते का ? एकमेकांना संकटकाळी साहाय्य करणे, मित्र किंवा मैत्रिण यांचे पाऊल चुकीच्या दिशेने जात असतांना त्यांना दिशादर्शन करणे, याला खरी मैत्री म्हणतात. एकमेकांना अडचणीच्या वेळी साहाय्य केल्याची अनेक उदाहरणे हिंदूंच्या प्राचीन इतिहासात पहायला मिळतात. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा हे त्यातीलच एक ! आताचे हिंदू मात्र पाश्‍चात्त्यांच्या आहारी जाऊन असे मैत्रीचे प्रदर्शन करण्यातच मोठेपणा मानतात. खरे तर राष्ट्र संकटात असतांना असे फाजील दिवस साजरे करण्यापेक्षा सर्व मित्रमंडळींचे राष्ट्र, धर्म आणि हिंदु संस्कृती यांवरील आघातांच्या संदर्भात प्रबोधन करून त्यांना राष्ट्रकार्यार्थ कृतीप्रवण करणे, हेच खरे राष्ट्र-धर्माप्रतीचे खरे सख्य आहे !

 

१. हातात ‘फ्रेंडशिप बँड’ (रंगीत कापडाचा पट्टा) बांधण्याचे तोटे

अ. ‘मनगटावरील तमोगुणी पट्ट्यामुळे दाब निर्माण होऊन अनावश्यक बिंदू दाबले जाणे आणित्यांच्यात तमोगुणीलहरींचे सिंचन होऊन त्या संबंधित अवयवांची कार्यक्षमता उणावणे :‘मनगटालापट्टा बांधल्यामुळे मनगटाभोवती काळ्या शक्तीच्या लहरींचे आवरण निर्माण होऊन बोटांतून काळ्या लहरीमनगटातून संपूर्ण देहात आणि बोटांच्या स्पर्शातून विविध वस्तूंमध्ये अन् वातावरणात प्रक्षेपित होतात.मनगटावर तमोगुणी पट्ट्यामुळे दाब निर्माण झाल्याने मनगटावरील बिंदू अनावश्यक दाबले जातात आणित्यांच्यात तमोगुणी लहरींचे सिंचन होऊन त्या संबंधित अवयवांपर्यंत पोहोचून अवयवांची कार्यक्षमता घटते.

आ. पट्ट्यामुळे देहात वाढलेल्या तमोगुणामुळे जिवाची बहिर्मुख वृत्ती वाढते. जीव वायूमंडलातीलसात्त्विक लहरी आणि विचार ग्रहण करू शकत नाही. त्यामुळे जिवाच्या साधनेत खंड येऊन तोसाधनेपासून दूर जाऊ शकतो.’

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १४.११.२००७, सायं. ७.२०)

 

२. हातात ‘फ्रेंडशिप बँड’ (रंगीत कापडाचा पट्टा)
बांधल्याने होणारे सूक्ष्मातील दुष्परिणामदर्शवणारे चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

अ. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील त्रासदायक स्पंदने

१. ३ टक्के’ – प.पू. डॉ. आठवले
२. ‘३ टक्के’ – सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (वैशाख कृ. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११३(१८.५.२०११))

 

३. ‘फ्रेंडशिप बँड’ बांधणे आणि कडे घालणे यांमुळे पुरुषांवर होणारे सूक्ष्मातील परिणाम

सध्या महाविद्यालयीन मुले-मुली एकमेकांशी मैत्री करण्यासाठी आणि मैत्रीची एक खूण म्हणून ‘फ्रेंडशिप बँड’बांधतात. हातात ‘फ्रेंडशिप बँड’ बांधणे, ही एक प्रथाच बनली आहे. त्यामुळे बरेच जण विक्रीकेंद्रातून(दुकानातून) तो विकत घेऊन स्वतःच्या हाताला बांधून घेतात. ‘फ्रेंडशिप बँड’ बांधल्याने व्यक्तीला शारीरिक,मानसिक किंवा आध्यात्मिक स्तरावर काहीच लाभ होत नाही. पुरुषांना हातात काही घालायचेच असल्यासत्यांनी तांब्याचे कडे घालणे चांगले; कारण ते सात्त्विक आहे.

 

४. सोने, चांदी आणि तांबे यांचे महत्त्व

सोने आणि चांदी यांच्याप्रमाणेच तांबे हाही सात्त्विकतेचे प्रक्षेपण करणारा धातू आहे. तांबे हा धातू शरिरातील उष्णता शोषून घेतो. अधिक माहितीसाठी ‘क्लिक’ करा !

 

५. हातात तांब्याचे कडे घातल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

अ. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील चांगली स्पंदने

१. ३ टक्के’ – प.पू. डॉ. आठवले
२. ‘३ टक्के’ – सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (वैशाख कृ. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११३(१८.५.२०११))

 

६. ‘फ्रेंडशिप बँड’ आणि कडे यांतील भेद

अ. ‘फ्रेंडशिप बँड’

अ १. हा बांधल्यामुळे व्यक्तीमध्ये अहं निर्माण होतो.

अ २. हा बांधणे हे मानसिक, तसेच भावनिक स्तरावरचे असून ‘त्याने मैत्री निर्माण होते’, ही एक अंधश्रद्धाचआहे.

आ. कडे

अ १. हे तांब्याचे असते. त्यामुळे यात मारक शक्ती निर्माण होते, तसेच तांबे सात्त्विक असल्यामुळे
कड्यामध्ये तारक शक्ती आणि काही प्रमाणात चैतन्य असते.

अ २. हे घातल्यामुळे व्यक्तीचे शरीरस्वास्थ्य चांगले रहाते.’

– सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (कार्तिक शु. ८, कलियुग वर्ष ५११३ (३.११.२०११))

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अलंकारशास्त्र’

Leave a Comment