सनातन (रामनाथी) आश्रमाला भेट देणारेदोन विदेशी वैज्ञानिक कार्य पाहून प्रभावित !

रामनाथी, येथील सनातनच्या आश्रमाला २ विदेशी वैज्ञानिकांनी भेट दिली. आश्रमात ठिकठिकाणी घडणार्‍या घडामोडींचे आध्यात्मिक दृष्टीकोनातून संशोधन करून त्याचे जतन केलेले पाहून ते प्रभावित झाले आणि त्यांनी त्याची प्रशंसाही केली.

सनातन संस्थेचे अमर्याद कार्य म्हणजे शाश्वताचे वैभव ! – प.पू. स्वामी गणेशानंद परमहंस

सनातन संस्थेचे कार्य म्हणजे शाश्वताचे वैभव आहे. या कार्याला कोणीही बंधने घालू शकत नाही, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्ह्यातील शिवशक्ती सिद्धपीठ सह्याद्री पहाड ट्रस्ट-मुक्तानंद तीर्थस्थळ आश्रमाचे प.पू. स्वामी गणेशानंद परमहंस यांनी काढले.

ह.भ.प. भगवान विठ्ठल कोकरे महाराज यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

ह.भ.प. कोकरे महाराज यांनी आश्रमभेटीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, सनातनचे कार्य संपूर्ण जगातील हिंदूंना प्रेरणादायी आहे. हा आश्रम नसून पृथ्वीवर भगवंताने धर्मराज्यासाठी उघडलेला धर्मदरबार आहे.

हिंदु संस्कृतीचा प्राण असणार्‍या भगवान सूर्यनारायणाची विविध फलदायी सूर्योपासना !

सूर्योपासना हा भारतवर्षाचा प्राण आहे. आपल्या ऋषीमुनींनी साधना करून सूर्योपासनेचे लाभ मिळवलेले आहेत. रथसप्तमीच्या पावन पर्वावर भगवान सूर्यनारायणाविषयीची सखोल, शास्त्रशुद्ध आणि आध्यात्मिक माहिती पुढे देत आहे.

जगद्विख्यात वास्तूतज्ञ डॉ. धुंडिराज पाठक यांचे सनातनच्या कार्याविषयी गौरवोद्गार !

लव्ह जिहाद, धर्मद्रोही जादूटोणाविरोधी कायदा यांच्या विरोधात आंदोलन उभारण्याचे आणि समाजजागृती करण्याचे अतिशय मोलाचे कार्य सनातन संस्था करत आहे, असे गौरवोद्गार जगद्विख्यात वास्तूतज्ञ डॉ. धुंडिराज पाठक यांनी काढले.

वैदिक गणिताचे जनक अन् पुरीपिठाचे १४३ वे पिठाधीश्‍वर श्री भारती कृष्णतीर्थजी महाराज !

राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी आयुष्य समर्पित करणारे वैदिक गणिताचे जनक अन् पुरीपिठाचे १४३ वे पिठाधीश्‍वर श्री भारती कृष्णतीर्थजी महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती पाहूया.

थेऊर येथे स्थापन केलेला चिंतामणि (अष्टविनायकांपैकी एक गणपति) !

महर्षि गृत्समदांनी श्री गणेशाची स्थापना केली. श्री क्षेत्र थेऊर (जिल्हा पुणे) येथे स्थापलेल्या श्री गणेशाचे नावही चिंतामणि हेच आहे. हे क्षेत्र आज अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध क्षेत्र आहे.

भक्तांच्या मनात भाव आणि भक्ती निर्माण करणारा श्री चिंतामणीचा महिमा !

यवतमाळपासून २३ कि.मी. अंतरावर श्री क्षेत्र कळंब गावातील प्रसिद्ध श्री चिंतामणि मंदिर हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

इन केबल नेटवर्कच्या श्री स्थानक वाहिनीवर (९७५ वर) सनातन संस्थेचे प्रवक्ते यांचा कार्यक्रम !

कल्याण येथे ६ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे महत्त्व श्री. आनंद जाखोटिया ४ फेब्रुवारीला ‘नमस्कार मंडळी’ या कार्यक्रमात सांगणार असून त्याचे प्रसारण संपूर्ण ठाणे शहरामध्ये होणार आहे.

श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व आणि त्यातील श्‍लोकाचा सुंदर भावार्थ

श्रीमद्भगवद्गीतेचा महिमा गंगा नदीपेक्षाही अधिक आहे. श्रीमद्भगवद्गीता ही गायीसमान आहे आणि तिचे दूध काढणारा गोपाळ हा भगवान श्रीकृष्ण आहे. गीतारूपी दुग्ध हे वेदांचे सार आणि अर्जुन हा गोवत्सासारखा (वासरासारखा) आहे. विवेकी महात्मे आणि शुद्ध भक्त या गीतारूपी दुग्धामृताचे पान करतात.