देवतेला अन्नाचा नैवेद्य दाखवण्यामागील शास्त्र
नैवेद्य दाखवतांना सात्त्विक अन्नाचा नैवेद्य भावपूर्णपणे प्रार्थना करून देवतेला अर्पण केल्यास त्या नैवेद्यातील पदार्थांच्या सात्त्विकतेमुळे देवतेकडून प्रक्षेपित होणा-या चैतन्य-लहरी नैवेद्यात आकृष्ट होतात. देवतेला नैवेद्य दाखवल्यामुळे त्यात आकृष्ट झालेल्या चैतन्याने त्या नैवेद्याच्या आजूबाजूचे वायूमंडल शुद्ध होते.