वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा)

हिंदु धर्माची बाजू परखडपणे मांडणारे, तसेच हिंदु धर्मावरील आघातांचे वेळोवेळी खंडण करणारे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांनी २१ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता शेगावजवळील त्यांच्या टाकळी या मूळ गावी देहत्याग केला. त्यांचे वय ८७ वर्षे होते.

सत्संग १ : साधनेचा सिद्धांत ‘व्‍यक्‍ती, तितक्‍या प्रकृती, तितके साधनामार्ग’ आणि साधनेची मूलभूत तत्त्वे – पातळीनुसार साधना, काळानुसार साधना

आजच्‍या सत्‍संगात आपण साधनेचा सिद्धांत ‘व्‍यक्‍ती, तितक्‍या प्रकृती, तितके साधनामार्ग’ आणि साधनेची प्रमुख तत्त्वे पातळीनुसार साधना आणि काळानुसार साधना समजून घेणार आहोत.

उज्जैनच्या महाकालेश्‍वर मंदिर परिसरात उत्खननात सापडले १ सहस्र वर्षे प्राचीन मंदिर !

येथील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या महाकालेश्‍वर मंदिराच्या विस्ताराचे काम चालू असतांना येथील उत्खननात १ सहस्र वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर सापडले आहे. या मंदिराच्या भिंतीवर आणि दगडावर नक्षीकाम केलेले आहे. याची माहिती मिळताच पुरातत्व विभागासह विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

हरिद्वार येथील वर्ष २०२१ च्या कुंभमेळ्यात होणार कोरोना नियमांचे पालन !

येथे पुढील वर्षी मार्च ते एप्रिल मासामध्ये कुंभमेळा होणार आहे. कोरोनाच्या काळात होत असलेल्या या कुंभमेळ्याच्या निमित्ताने सर्व प्रकारचे नियम पाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सामाजिक अंतर राखत येथे गंगा नदीमध्ये भाविकांना स्नान करावे लागणार आहे.

प्रवचन ३ : अध्यात्म हे कृतीचे शास्त्र

आपल्या प्रत्येकाची धडपड आनंदप्राप्तीसाठी असली, तरी सध्या सर्वांचे जीवनच संघर्षमय आणि तणावाचे झाले आहे. तणावविरहित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी अध्यात्म कृतीत आणणे म्हणजे साधना करणेच आवश्यक आहे. आज आपण ‘नामजपामुळे होणारे लाभ आणि सत्संगाचे महत्त्व’ हा विषय पहाणार आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या आध्यात्मिक संस्था निर्माण करणार असलेले ‘साधक-वृद्धाश्रम’ यांचे महत्त्व ओळखा !

परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातनच्या साधकांना सहसाधकांकडे आणि त्यांच्या कुटुंबियांकडेही ‘आपले कुटुंबीय’, या भावाने पहाण्यास शिकवले आहे.

मा.गो. वैद्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारांची हानी !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंतक माधव गोविंद उपाख्य बाबूराव वैद्य यांच्या निधनामुळे ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’च्या विचारांची हानी झाली आहे.

प्रवचन २ : साधनेच्‍या प्राथमिक अंगांचे शिक्षण

आपल्यापैकी प्रत्येकाने सुखाच्या क्षणांचा आणि दुःखाचाही अनुभव घेतला आहे. प्रत्येकाची धडपड सुखप्राप्तीसाठी असली, तरी बहुतांश वेळेला दुःखच आपल्या पदरी येते, असा आपला अनुभव असतो. सर्वसाधारणपणे सध्याच्या काळात मानवी जीवनात सुख सरासरी २५ टक्के आणि दुःख ७५ टक्के असते.

प्रवचन १ : आनंदी जीवनासाठी आणि आपत्काळाच्या दृष्टीने अध्यात्माचे महत्त्व

धर्मशास्त्रात ईश्वरप्राप्तीचे म्हणजे आनंदप्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले आहेत; पण या सहस्रो साधनामार्गांपैकी नेमक्या कोणत्या साधनेला आज प्रारंभ करावा, हे बहुतेकांना ठाऊक नसते. त्यामुळे बरेच जण त्यांना जे आवडते किंवा जसे वाटते, त्याप्रमाणे साधना करण्याचा प्रयत्न करतात.