हरिद्वार (उत्तराखंड) – येथे पुढील वर्षी मार्च ते एप्रिल मासामध्ये कुंभमेळा होणार आहे. कोरोनाच्या काळात होत असलेल्या या कुंभमेळ्याच्या निमित्ताने सर्व प्रकारचे नियम पाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सामाजिक अंतर राखत येथे गंगा नदीमध्ये भाविकांना स्नान करावे लागणार आहे. येथे कोरोनाच्या तपासणीसाठी ३ मोठी केंद्रेही बनवण्यात येणार आहेत. या वेळी प्रथमच सामान्य घाटांसह नैसर्गिक घाटांचाही उपयोग केला जाईल. तात्पुरत्या स्वरूपातील प्लास्टिकच्या या घाटांवर सुरक्षेसाठी ‘डीप वॉटर बॅरिकेडिंग’ असेल. प्रत्येक बॅरिकेडिंग ४ मीटर परिसरात असणार आहे. भाविकांना सुरक्षितपणे अंघोळ करता यावी, यासाठी यात ४ फूट पाणी असणार आहे. कुंभसाठी पहिले स्नान ११ मार्च २०२१ या दिवशी महारशिवरात्रीला होणार आहे, तर शेवटचे चौथे २७ एप्रिलला चैत्र पौर्णिमेला होणार आहे.
हरिद्वार येथील वर्ष २०२१ च्या कुंभमेळ्यात होणार कोरोना नियमांचे पालन !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !

