‘करिअर’ आणि ‘धनयोग’ यांचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विश्लेषण !
‘पत्रिकेनुसार कोणत्या क्षेत्रातून अर्थप्राप्ती होईल ?’, याचा विचार करून शिक्षण घेणे अधिक योग्य असते. ‘व्यवसाय कोणता करावा ? कोणत्या व्यवसायातून अधिक पैसा मिळेल ?’, यासाठी पत्रिकेतील अर्थ त्रिकोण म्हणजे २, ६ आणि १० ही स्थाने, तसेच या राशीतील ग्रहस्थिती व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.