कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना बुरशीजन्य आजारांचा विळखा !

कोरोनाचा आजार झाल्यानंतर उपचार घेऊन घरी परतलेल्या अनेक रुग्णांना फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य आजाराचा विळखा बसत असल्याचे समोर आले आहे. या नव्या संसर्गामुळे डोळ्यांच्या समस्या, जबड्यांचे विकार यांमध्ये भर पडली आहे.

‘कोरोना महामारीत मनाला स्थिर कसे करावे ?’ या विषयावर समाजासाठी उद्बोधक चर्चासत्र

आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे, हा महत्त्वपूर्ण उपाय आहे. आत्मबळ वाढल्यास व्यक्ती कोरोनासारख्या महामारीतही स्थिर राहू शकते. व्यक्तीला कर्मफलन्यायानुसार प्रारब्ध भोग भोगावे लागतात; परंतु साधना केल्यामुळे प्रारब्ध भोगाची तीव्रता न्यून होते, तसेच ते सुसह्य होते. कोरोनासाठीही साधना करणे, हाच उपाय आहे. कोरोनाच्या बातम्या पाहून अनेकांना ताण येत आहे. या ताणापासून मुक्तता मिळवण्यासाठी नामजप केल्यास लाभ होतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वादनकलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीची दिलेली एक अमूल्य संधी !

आजकाल पाश्चात्यांची वाद्ये भारतीय वाद्यांच्या तुलनेत प्रगत असल्याचे स्थुलातून दिसत असले, तरी सूक्ष्मातून त्यांचा परिणाम चांगला होत नाही. याचा एका कार्यक्रमामध्ये पुढीलप्रमाणे प्रयोग करून घेतला होता.

‘गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का ?’ यावर होणार संशोधन !

केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का ? यावर संशोधन करण्यासाठी हृषिकेश येथील एम्स रुग्णालयाला ३ लाख रुपयांचा निधी दिला आहे.

केरळमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप भावपूर्ण वातावरणात पार पडला

हनुमान जयंतीच्या पावन दिवशी मल्याळम् भाषेत ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप घेण्यात आला. याला अनेक भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हनुमानाच्या विषयीचे प्रवचन कु. रश्मि परमेश्वरन् यांनी घेतले.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने हनुमान जयंती निमित्त ‘ऑनलाईन’ सोहळा !

हनुमानाचा जप, श्रीराम आणि हनुमान यांची आरती, मारुतिस्तोत्र, हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन, हनुमंताची मानसपूजा असे सर्वत्रच्या कार्यक्रमाचे स्वरूप होते.

देशात प्रतिदिन होत आहे ३ सहस्र ४१७ जणांचा मृत्यू !

देशात कोरोनामुळे मागील १४ दिवसांमध्ये मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ‘कोविड ट्रॅकर’नुसार देशात सध्या प्रतिदिन साधारणतः ३ सहस्र ४१७ जणांचा मृत्यू होत आहे. ४ आठवड्यांआधी ही संख्या ७८७ च्या जवळपास होती. कोविड ट्रॅकरनुसार भारतात मागील १४ दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत ८२ टक्के वाढ झाली आहे.

भारतात तिसरी लाट येणे अटळ ! – केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन्

भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पहाता ते होणार आहे. केवळ ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणे कठीण आहे. आपण या तिसर्‍या लाटेसाठी सिद्ध रहायला हवे, असे केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन् यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

जीवनात ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग या सूत्रांचा स्वीकार करा ! – ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर

संयम, चिकाटी, धैर्य, शिस्तबद्धता, कामात झपाटणे, विश्‍लेषणात्मकता, संशोधनात्मक वृत्ती, प्रतिभा आणि वक्तृत्व या कलागुणांनी विद्यार्थ्यांनी जीवनात उतरायला हवे.

संसर्गाच्या कालावधीत घ्यावयाचा आहार आणि आरोग्याची स्थिती लवकर पूर्वपदावर येण्यासाठीचे उपाय

सध्या सगळ्यांनाच कळून चुकले की, या ना त्या पद्धतीने संसर्ग आपल्यालाही होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे दिवस गेले. सध्या एकच तत्त्व सगळ्यांनी पाळले पाहिजे की, संसर्ग आपल्याला होऊ शकतो; पण आपले आरोग्य पूर्वस्थितीला येण्याची गती (रिकव्हरी रेट) उत्तम असली पाहिजे.