श्री रेणुकादेवीप्रती भक्तीभाव असणारे, राणीसावरगाव (जिल्हा परभणी) येथील श्री. गोविंदराव गळाकाटू (सावरगावकर) (वय ८६ वर्षे) संतपदी विराजमान !

सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी पू. गोविंदराव गळाकाटू (सावरगावकर) यांचा सन्मान सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे चित्र देऊन केला. या घरगुती कार्यक्रमामध्ये त्यांचे काही नातेवाईक उपस्थित होते.

सामाजिक माध्यमांद्वारे श्री गणेशाच्या नावाचे पारपत्र प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान !

‘भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन होणार’, या संकल्पनेवर श्री गणेशाचे चित्र असलेले पारपत्र (पासपोर्ट) सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान करण्यात आल्याचे समोर आले आहे. या पारपत्रावर भाग्यनगर (हैद्राबाद) पारपत्र कार्यालयाचा शिक्का असून पारपत्र प्रदान अधिकारी म्हणून पी. कृष्णा चार्या यांचे नाव आणि स्वाक्षरी आहे. हे पारपत्र विनोद म्हणून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे.

केरळ येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने भक्तीमय वातावरणात ‘ऑनलाईन नामजप यज्ञ’ (सामूहिक नामजप) पार पडला !

या नामजप यज्ञाच्या प्रारंभी सनातनच्या साधिका कु. प्रणिता सुखठणकर यांनी श्रीकृष्णाची भावार्चना सांगितली. त्यानंतर श्रीकृष्णाचा नामजप ऑनलाईन लावण्यात आला आणि सर्व जिज्ञासूंनी तसा नामजप केला.

सांगली आणि कोल्हापूर येथील स्थानिक केबल वाहिनीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशेष सत्संग मालिकेचे प्रक्षेपण !

सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या २१ भागांच्या या मालिकेत श्री गणेशचतुर्थी आणि श्री गणेश उपासना, गणेश चतुर्थीच्या काळात येणारी महत्त्वाची व्रते इत्यादी माहिती असेल.

‘श्री शिवगिरी सेवा संघा’चे संस्थापक आणि अध्यक्ष दिलीप खोत यांचे निधन

दिलीप शंकर खोत उपाख्य दादा खोत यांचे ५ सप्टेंबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता वयाच्या ७४ व्या वर्षी पनवेल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. कै. दादा खोत हे ‘श्री शिवगिरी सेवा संघ’ या आध्यात्मिक संप्रदायाचे संस्थापक आणि अध्यक्ष होते.

बहुगुणी भीमसेनी आयुर्वेदीय कापूर !

भीमसेनी आयुर्वेदीय कापराला विशिष्ट आकार नसतो. हा कापूर स्फटिकासारखा असतो. याच्या गोल किंवा चौकोनी वड्या करता येत नाही; कारण नेहमीच्या कापरासारखे यात मेण नसते.

विविध आजार आणि अग्निहोत्राची उपयुक्तता !

कोरोना विषाणूचा जगभर प्रादुर्भाव झाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आपण वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) हे नियम पाळले पाहिजेत.

भगवद्प्राप्ती कशी करावी ?, याचे मार्गदर्शन सनातन संस्था करते ! – लक्कावल वेंकट गंगाधर शास्त्री, संस्थापक, भगवद्गीता फाऊंडेशन, भाग्यनगर

भगवद्भक्ती केल्याने मानव जन्माचे सार्थक होते, याविषयीचे मार्गदर्शन सनातन संस्था विविध माध्यमांतून समाजाला करत असते. सनातन संस्थेने नुकतीच तेलुगु भाषेतील ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘ॲप’ची निर्मिती केली आहे.

निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या हिंदुद्वेषी अभद्र युतीचा वैध मार्गाने विरोध करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

ख्रिस्ती आणि जिहादी साम्राज्यवादी शक्तींना वैश्‍विक हिंदुत्वाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी भारतातील राजकीय विचारांचे निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या साहाय्याने १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत  ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या विषयावर जागतिक पातळीवर ऑनलाईन परिषद आयोजित केली आहे.

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विजेवर चालणार्‍या दुचाकी वाहनांची आवश्यकता !

सनातन संस्था ही अध्यात्मप्रसार करणारी संस्था असून हे कार्य अर्पणदाते, हितचिंतक, विज्ञापनदाते यांनी दिलेल्या अर्पणावर चालते. सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात दैनंदिन कामकाजासाठी पेट्रोलवर चालणारी वाहने वापरण्यात येतात. सध्या पेट्रोलचे दर वाढत असल्यामुळे त्यावरील दुचाकी वाहने चालवणे खर्चिक झाले आहे.