
सोलापूर, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – दिवाळी जवळ येताच सर्वत्रचे वातावरण मंगलमय होण्यास प्रारंभ होतो. दिवाळीला काही दिवस शेष असतांना सोलापूर येथे झालेल्या संत सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून येथील साधकांनी आनंददीप लागल्याचे अनुभवले. समष्टी साधनेची तीव्र तळमळ, साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास घेऊन त्यांना सातत्याने साधनेत आईप्रमाणे साहाय्य करणार्या, तसेच श्रीकृष्णाप्रती गोपीभाव असलेल्या कु. दीपाली मतकर या २८ ऑक्टोबर या दिवशी सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या. सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन पू. (कु.) दीपाली मतकर यांचा सन्मान करण्यात आला. ही आनंदवार्ता ऐकून सर्वांचा भाव जागृत झाला आणि सर्वांना पुष्कळ आनंद झाला.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !